लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण व शहरी भागातील माता तसेच बाल मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागातर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील १६ हजार २३१ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच कोटी ७४ लाख ६१ हजाराचे अनुदान वितरित करण्यात आले.आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा महिलांना योग्य उपचार मिळाला नाही तर माता व बाळाचाही मृत्यू होऊ शकतो.या घटना टाळण्यासाठी केंद्र सरकारने २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची सुरूवात केली. योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला पाच हजार रुपये दिले जाते जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात मातेने नोंदणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यात एक हजार व उपचारानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन हजार व तिसऱ्या टप्प्यात एक हजार असे एकूण पाच हजार रुपये दिले जाते. बल्लारपूर नगर परिषदेत १२७, भद्रावती ६९, ब्रह्मपुरी ६३, चंद्रपूर महानगर पालिकेअंतर्गत १,०८० गर्भवती मातांनी योजनेचा लाभ घेतला. जिल्हा परिषद आरोग्य विभाग आरोग्य विभागाने योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली. आरोग्य क्षेत्रात काम करणाºया स्वयंसेवी संस्था या मोहिमेला सहकार्य करणार आहेत. या करिता या संस्थांना आरोग्य विभागाच्यावतीने प्रशिक्षण देण्यात आले.चंद्रपूर, ब्रह्मपुरी तालुका अव्वलप्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील गर्भवती मातांचा योग्य प्रतिसाद मिळत आहे. मात्र, शहरी भागातील महिलांनी याकडे दुर्लक्ष केले. बल्लारपूर तालुका क्षेत्रात ४०६, भद्रावती ७३८, ब्रह्मपुरी १३२४, चंद्रपूर एक हजार ५३४, चिमूर एक हजार ९६, गोंडपिपरी ७८९, जिवती ५१६, कोरपना ९६२, मूल तालुक्यात एक हजार ११, नागभीड एक हजार २१९, पोंभूर्णा ६६०, राजुरा एक हजार २२३, सावली एक हजार ३१०, सिंदेवाही एक हजार ५० आणि वरोरा तालुक्यातील एक हजार ४४ गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.महिला जागृतीकडे विशेष लक्षही योजना अतिशय महत्त्वपूर्ण असल्याने ग्रामीण व शहरी भागातीत महिलांमध्ये जागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.
१६ हजार २३१ महिलांनी घेतला मातृ वंदना योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 10:38 PM
ग्रामीण व शहरी भागातील माता तसेच बाल मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागातर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील १६ हजार २३१ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच कोटी ७४ लाख ६१ हजाराचे अनुदान वितरित करण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : पाच कोटी ७४ लाखांचे अनुदान वितरण