चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासांत १,०४४ जणांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत १६ हजार ८०९ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर
१,४५८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. रविवारी २५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६२ हजार ८९५ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ४५ हजार १३२ झाली आहे. सध्या १६ हजार ८०९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ८४ हजार ६९३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३ लाख १६ हजार ९०६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
रविवारी मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील सरकारनगर येथील ७३ वर्षीय पुरुष, कृष्णानगर येथील ३८ वर्षीय पुरुष, तुकूम येथील ४३ व ६३ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, ५८ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील संतोषीमाता वार्ड येथील ५४ व ७३ वर्षीय पुरुष, विसापूर येथील ७५ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील ६४ वर्षीय पुरुष, धानोरा येथील ६२ वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील ४१ वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील ६० वर्षीय पुरुष, विनायक लेआउट परिसरातील ५१ वर्षीय महिला, ६५ वर्षीय महिला, नागभीड तालुक्यातील तळोधी येथील ५८ वर्षीय महिला, ६७ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर परिसरातील ७८ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय पुरुष, टिळकनगर येथील ४५ वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील ४२ वर्षीय पुरुष, सरडपार येथील ४० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बाॅक्स
असे आहे बाधित
जिल्ह्यात आतापर्यंत ९५४ बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ८८४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २८, यवतमाळ २७, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.
बाॅक्स
रविवारचे बाधित
रविवारी बाधित आलेल्या १,४५८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ३५२, चंद्रपूर तालुका ८४, बल्लारपूर ८७, भद्रावती ११०, ब्रह्मपुरी ६६, नागभिड २५, सिंदेवाही ९९ , मूल ७९, सावली ४९, पोंभुर्णा २१, गोंडपिपरी ४२, राजुरा ५२, चिमूर ५७, वरोरा २०३, कोरपना ११८ व इतर ठिकाणच्या १४ रुग्णांचा समावेश आहे.