शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

आठवडाभरात पोस्टात उघडली १६,८०० खाती!

By साईनाथ कुचनकार | Published: July 11, 2024 8:26 PM

लाडक्या बहिणींच्या मदतीला पोस्ट विभाग आले धावून : बहिणींची पोस्टाला अधिक पसंती

चंद्रपूर : राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी सध्या महिलांची शासकीय कार्यालयांसह शाळा, ग्रामपंचायतीमध्ये गर्दी होत आहे. दरम्यान, योजनेसाठी बँकेमध्ये खाते असणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील बहुतांश बहिणी पोस्ट बँकेला अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे १ ते ८ जुलैपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात पोस्टाद्वारे तब्बल १६ हजार ८०० खाती काढण्यात आली आहेत.

पोस्ट गावागावांपर्यंत पोहोचले असून, पोस्ट कार्यालयावर आजही नागरिकांचा विश्वास आहे. कमी वेळात आणि थेट गावातच खाते काढून मिळत असल्याने बहुतांश महिला इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खाते उघडत आहेत. इतर ठिकाणी खाते उघडण्यासाठी गेले तर दिवसभराची मजुरी बुडते, त्या तुलनेत गावात खाते उघडून मिळत असल्याने मजुरीसुद्धा होत असल्याने ग्रामीण भागात महिलांची पोस्ट कार्यालयात गर्दी होत आहे. योजना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात १६ हजार ८०० खाती काढून देण्यात आले असून, महिलांच्या मदतीसाठी पोस्ट बँक धावून आल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

नागरिकांचा पोस्ट कार्यालयावर विश्वास आहे. आजही अनेक योजनांच्या माध्यमातून नागरिक पोस्ट बँकेतून व्यवहार करतात.आधार कार्ड सोबत नेले तरी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून खाते काढून दिले जाते. जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी पोस्ट कार्यालयात जाऊन किंवा पोस्टमन यांच्याशी संपर्क साधून खाते उघडून घ्यावे.-एस. रामाकृष्णाप्रवर अधीक्षक, चंद्रपूर 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस