उद्यापासून धम्मचक्र अनुवर्तन सोहळा : शहरी व ग्रामीण भागात सुविधाचंद्रपूर : चंद्रपूरचा धम्मचक्र अनुवर्तन सोहळा दोन दिवसांवर आला आहे. दिक्षाभूमी येथील आयोजन समितीसह प्रशासनही तयारीला लागले आहे. यावर्षी राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाने चंद्रपूर व ग्रामीण भागातील बौद्ध अनुयायांना दिक्षाभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी १७ अतिरिक्त बससेवेचे नियोजन केले आहे. १५ आॅक्टोबरला दुपारी २ वाजता आणि १६ आॅक्टोबरला सकाळी १० वाजतापासून या अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दिक्षा दिल्यानंतर दोन दिवसांनी चंद्रपूर येथे अनुयायांसाठी दिक्षा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या दिक्षा समारंभाचा वर्धापन दिन धम्मचक्र अनुवर्तन सोहळा म्हणून साजरा केला जातो. या समारंभाची सुरुवात १५ आॅक्टोबर रोजी होत असल्याने त्या दिवसापासूनच बौद्ध अनुयायी चंद्रपूरला येत असतात. त्याकरिता एसटी महामंडळातर्फे १५ आॅक्टोबरपासून अतिरिक्त एस.टी. बसेस सोडण्यात येत आहेत.चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ आदी जिल्ह्यांसह तेलंगणा व छत्तीसगड या राज्यातील बौद्ध अनुयायी नागपूर येथील कार्यक्रमाला न जाता चंद्रपूर येथे होणाऱ्या धम्मचक्र अनुवर्तन सोहळ्याला उपस्थित राहात असतात. गेल्या वर्षी राज्य परिवहन महामंडळाने चंद्रपूर शहराअंर्तत विविध वार्डातून दिक्षाभूमीवर जाणे-येणे करण्यासाठी अतिरिक्त बससेवेची व्यवस्था केली होती. त्या प्रथम प्रयत्नाला बौद्ध अनुयायांनी उदंड प्रतिसाद दिला. ते लक्षात घेऊन यावर्षी चंद्रपूर शहरातून अतिरिक्त बस सोडण्यात येत आहेत. मागणी झाल्यास भिवापूर वार्ड जादा बसेस सोडण्यात येतील, असे विभागीय नियंत्रक एस. के. सहारे यांनी सांगितले. तसेच बल्लारपूर, भद्रावती, उर्जानगर येथूनही अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)चंद्रपूरमध्ये सहा शहरी बसेसचंद्रपूर शहरातील बौद्ध अनुयायांकरिता बाबुपेठ रेल्वे स्टेशन येथून चार अतिरिक्त बस सोडण्यात येत आहे. या बस बायपास बल्लारशामार्गे बंगाली कॅम्प आणि तेथून चंद्रपूर बसस्थानक येथे पोहोचतील. सतेच अंचलेश्वर ेट, बागला चौक, भिवापूर वार्ड व बायपास मार्गे दोन अतिरिक्त बसेस सोडण्यात येत आहेत. उर्जानगर येथून तीन बसेसचंद्रपूर शहरालगतच्या उर्जानगर ते दुर्गापूर, तुकूम मार्गे तीन अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. गरज पडल्यास घुग्घुस येथूनही अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहे. जुनोना फाटा ते बायपास मार्गे चंद्रपूर बसस्थानकासाठी अतिरिक्त चार बसेस धावणार आहेत. बल्लारपूर, भद्रावती येथून प्रत्येकी दोन बसेसग्रामीण भागातील बौद्ध अनुयायांसाठी बल्लारपूर येथून चंद्रपूर बसस्थानकापर्यंत अतिरिक्त दोन बसेस सोडण्यात येणार आहेत. भद्रावती येथूनही अतिरिक्त दोन बसेस धावणार आहेत.
एसटी सोडणार १७ अतिरिक्त बसेस
By admin | Published: October 14, 2016 1:21 AM