शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

चंद्रपुरातील सहा विधानसभा मतदारसंघांत १७१ नामांकन दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 2:19 PM

आज होणार छाननी : ४ नोव्हेंबरला घेता येणार उमेदवारी मागे

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २९) एकूण १७१ नामांकन दाखल झाले. २२ ऑक्टोबरला निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आज शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण १०५ अपक्ष उमेदवारांनीही मिरवणूक व शक्तिप्रदर्शन करून नामांकन केल्याचे दिसून आले.

राजुरा विधानसभा क्षेत्रात आज ३० नामांकन दाखल झाले. महायुती भाजपचे देवराव भोंगळे, स्वतंत्र भारत पक्षाचे अॅड. वामनराव चटप यांनी शहरातून मिरवणूक काढून नामांकन दाखल केले. अन्य उमेदवारांत निनाद बोरकर (अपक्ष), रेशमा चव्हाण (जनवादी पार्टी), भूषण फुसे (अपक्ष), प्रवीण सातपाडे (अपक्ष), मंगेश गेडाम (रिपाई), प्रवीण कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी), गजानन जुमनाके (गोडवाना गणतंत्र पार्टी), अरुण धोटे (अपक्ष), किरण गेडाम (अपक्ष), चित्रलेखा धंदरे (अपक्ष), अभय डोंगरे (बसप), सचिन भोयर (मनसे), वामन आत्राम (अपक्ष) आदींचा समावेश आहे. चंद्रपूर मतदारसंघात महाविकास आघाडी काँग्रेसकडून प्रवीण पडवेकर, ब्रिजभूषण पाझारे (अपक्ष), राजू झोडे (अपक्ष), महेश मेंढे (अपक्ष), विनोद खोब्रागडे (अपक्ष), प्रकाश रामटेके (बहुजन मुक्ती पार्टी), मनोज लाडे (बसपा), प्रकाश ताकसांडे, कोमल किशोर जोरगेवार (अपक्ष), मोरेश्वर बडोले (अपक्ष), अॅड. विशाल रंगारी ( बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी), अरुण कांबळे, बबन कासवटे (अपक्ष), स्नेहल रामटेके (वंचित बहुजन आघाडी), आशिष माशीरकर, आनंद इंगळे (अपक्ष), संजय गावंडे, ज्ञानदेव हुमणे, देवानंद लांडगे, रतन गायकवाड (अपक्ष), प्रवर्तन आवळे (अपक्ष), परशुराम भिमनवार (राष्ट्रीय समाज पक्ष), अॅड. राहुल घोटेकर, अशोक म्हस्के (अपक्ष), भावेश मातंगी (अपक्ष), प्रतीक डोलींकर (ऑल इंडियन रिपब्लीक पार्टी) यांनी नामांकन दाखल केले. 

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे संतोषसिंह रावत, डॉ. अभिलाषा गावतुरे (अपक्ष), संदीप गिन्हे (अपक्ष) यांच्यासह १५ जणांनी उमेदवारी दाखल केली. ब्रह्मपुरीत भाजपचे उमेदवार कृष्णा चहारे यांनी मिरवणूक काढून नामांकन दाखल केले. अन्य १३ उमेदवारांनीही उमेदवारी दाखल केली. चिमूरमध्ये १० जणांनी नामांकन भरले. वरोरा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून करण देवतळे, काँग्रेसचे प्रवीण काकडे, डॉ. चेतन खुटेमाटे (अपक्ष), अनिल धानोरकर (अपक्ष) यांनी शक्तिप्रदर्शन करीत नामांकन दाखल केले. 

'त्या' अधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार

  • महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तसेच स्थायी निगराणी पथक (एसएसटी) आणि फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्यात आले. 
  • क्षेत्रीय अधिकाऱ्यांना १३ ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तर स्थायी निगराणी पथक व फिरते पथक प्रमुखांना १५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीसाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. या अधिकाऱ्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १४८, १५२, १६१ व १६३ अन्वये शक्त्ती प्रदान केल्याची माहिती गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिली.

दोन मतदार मतदारसंघांचे निरीक्षक दाखल राजुरा व चंद्रपूर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून आर. मुत्यालाराजु रेवु यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. २००७ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील ते अधिकारी आहेत. निवडणूक कालावधीत त्यांच्या निवासाचा पत्ता 'पांगारा' कक्ष, वन अकादमी मूल रोड चंद्रपूर येथे आहे. दोन मतदारसंघातील नागरिक व राजकीय पदाधिकाऱ्यांसाठी ते दररोज सकाळी ११ ते १२ वाजता या वेळेत 'पांगारा' कक्षात उपलब्ध असतील.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूर