शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

चांदा खंड खरेदी विक्री संस्थेचे १७६ सभासद बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 1:19 PM

चांदा खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेत तब्बल १७६ जणांना शेतकºयांच्या नावावर गैर शेतकºयांना सभासदत्व बहाल केल्याची धक्कादायक बाब सहाय्यक निबंधकांच्या चौकशी अहवालातून उघड झाली आहे.

ठळक मुद्दे संस्था निवडणुकीतही बजावला हक्कसहाय्यक निबंधकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

राजेश भोजेकर ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चांदा खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेत तब्बल १७६ जणांना शेतकऱ्यांच्या  नावावर गैरशेतकऱ्यांना सभासदत्व बहाल केल्याची धक्कादायक बाब सहाय्यक निबंधकांच्या चौकशी अहवालातून उघड झाली आहे. अहवालाला महिनाभरापेक्षा अधिक कालावधी होऊनही त्या बोगस सभासदांचे सदस्यत्व मात्र कायमच आहे हे विशेष.चांदा खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संघात गैर शेतकऱ्यांचा मागील सहा वर्षांपासून भरणा सुरू असल्याची गंभीर तक्रार या संस्थेचे सभासद रामदास चौधरी व काही सदस्यांनी सहाय्यक निबंधकाकडे २६ आॅगस्ट २०१६ रोजी केली होती. या संस्थेत ज्यांच्या नावे सातबारा आहे अशा शेतकऱ्यांनाच सभासद होता येते. मात्र सातबारा नसतानाही ११५० ते १३३५ अनुक्रमांक असलेल्यांना सभासदत्व देण्यात आल्याची बाब तक्रारीत नमुद होती. या तक्रारीवर सहाय्यक निबंधकाने तब्बल आठ महिन्यांनी म्हणजेच २६ एप्रिल २०१७ रोजी तक्रारकर्त्यांना एका पत्रातून थातुरमातूर उत्तर पाठवून कर्तव्य बजावले. हा अहवाल कोणतीही चौकशी न करता संस्थेच्या कार्यकारी मंडळाने दिलेल्या माहितीच्या आधारेच बनविल्याचे त्यांच्याच पुढील अहवालातून उघड झाले. २ आॅगस्ट २०१७ रोजी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधकांनी सभासदांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सदर ११५० ते १३३५ अनुक्रमांक असलेल्या सभासदांचे सातबारा व ते तालुक्यातील कार्यक्षेत्रात राहणारे आहेत काय, अशी विचारणा सहाय्यक निबंधक व सहकारी संस्थेचे तालुका लेखापरीक्षक यांना पत्र पाठवून केली. तसेच सहायक निबंधकाच्या चौकशीवरही ताशेरे ओढले. सातबारा असल्याशिवाय शेतकरी सभासद होता येत नाही. मात्र असे अध्यक्ष व सचिव यांनी करून घेतलेले आहेत व त्यांनी निवडणुकीत भाग घेतलेला आहे, या तक्रारीची जाणिवही जिल्हा उपनिबंधकांनी सहाय्यक निबंधकाला करून दिली. याबाबतचा सखोल अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे आदेशच बजावले होते. यानंतर मात्र सहाय्यक निबंधकाने पणन संचालक व जिल्हा उपनिबंधकांना चौकशी अहवाल पाठवून १७६ सभासद बोगस असल्याची बाब मान्य केली. यामध्ये अनुक्रमाक ११५० ते १३३५ पर्यंतच्या सभासदांपैकी नऊ सभासदांकडेच सातबारा असून उर्वरित १७६ सभासदांचा शेतकरी असल्याचा सातबारा हा पुरावा नाही. त्यामुळे त्यांचे सभासदत्व करण्याबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ११ अन्वये कार्यवाही करण्यात येत असल्याचेही नमुद करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही त्या १७६ जणांचे सभासदत्व कायम ठेवले आहे.कार्यवाहीकडे सभासदांचे लक्षचांदा खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक १४ आॅगस्ट २०१६ रोजी झाली. सुभाष रघाताटे हे मागील २० वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्षपदावर आहे. मागील निवडणुकीत उपरोक्त बोगस सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आता चौकशीत सदर सभासद बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहेत. यामुळे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीवरही आपोआपच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारकर्त्या सभासदांनीही अध्यक्ष व कार्यकारी मंडळ बरखास्त करण्याची मागणी केल्यामुळे सहाय्यक निबंधकाच्या कार्यवाहीकडे सभासदांचे लक्ष लागले आहेत.चांदा खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या त्या १७६ जणांचे सभासदत्व रद्द केलेले नाही. येत्या सोमवारी त्यांना नोटीस बजावणार आहेत. त्यांचे म्हणणेही ऐकून घेणे आवश्यक आहे. यात त्यांना दहा दिवसांची मुदत द्यावी लागेल. त्यांच्याकडे काही कागदपत्र असतील तर त्यांना त्यातून वगळले जाईल. कायद्याची प्रक्रिया असल्यामुळे थोडा वेळ लागेल. कर्जमाफीच्या प्रक्रियेत असल्यामुळे कार्यवाहीला उशिर झाला. सभासदत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीत भाग घेतला असेल तर त्यांचे संचालकपद रद्द होईल. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला असेल तर संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी मात्र तक्रारकर्त्यांना न्यायालयात दाद मागावी लागेल.- एम.ई. भगत, सहय्यक निबंधक,सहकारी संस्था, चंद्रपूर

टॅग्स :Farmerशेतकरी