शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

चंद्रपूरच्या पाणी समस्येवर मंत्रालयात १७ ला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:08 AM

शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १७ एप्रिल रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची उपस्थिती : मुनगंटीवार यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १७ एप्रिल रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा होते. मात्र पाणी पुरवठ्यात उद्वलेल्या अडचणी दूर करत शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी बैठक आयोजित करून तोडगा काढण्याची विनंती ना. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यानुसार १७ एप्रिलला दुपारी १ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, महापालिका आयुक्त संजय काकडे, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आयोजित ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत ठोस उपाययोजना होणार आहेत.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार