लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी: मागील अठरा दिवसांपासून कोठारी येथील कोंडवाड्यात २८ जनावरांना बंदिस्त करण्यात आले. ग्रामपंचायतकडून जनावरांना चारापाण्याची व्यवस्था केली नाही. जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एका गाईचा मृत्यू झाला तर काही जनावरे मृत्यूच्या दारावर आहेत.१ आॅगस्टला जनावरांची तस्कारी करत असताना कोठारीचे ठाणेदार संतोष अंबीके यांनी २८ जनावरांना वाहनासह ताब्यात घेतले होते. त्यानंतर ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात रवानगी केली. कोंडवाड्यातील बंदीस्त जनावरांच्या देखभालीसाठी चारा पाण्याची व्यवस्था करणे ग्रा.पं. प्रशासनाचे कर्तव्यच आहे. पण याकडे कानाडोळा करण्यात आला. कोंडवाड्यात चिखलाचे साम्राज्य पसरले. जनावरांना बसण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने उभे राहावे लागते. चारापाणी न दिल्याने ही जनावरे अशक्त झाली आहेत. चिखलामुळे जनावरांना जखमा झाल्या. शुक्रवारी कोंडवाड्यातच एकाचा मृत्यू झाला. तरीही ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. दरम्यान हा प्रकार येथील जागरूक नागरिक आशिष भरारकर, इरफान शेख, दिनेश पेरगुलवार यांच्या लक्षात आल्यानंतर ग्रा.पं. प्रशासनाच्या नजरेस आणून दिले. मात्र त्यानंतरही स्वच्छता व चारा, पाण्याची व्यवस्था तसेच पशु वैद्यकीय अधिकाºयांकडून उपचार करण्यात आले नाही. कोंडवाड्यातील या जनावरांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे.तातडीने चारा आणि औषधोपचार केला नाही तर मुकी जनावरे केव्हाही प्राण सोडू शकतात. त्यामुळे गावकºयांमध्ये ग्रापं प्रशासनाविरूद्ध तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.कोंडवाड्यात बंदीस्त जनावरांना चारा-पाणी व आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मरसासन्न अवस्थेत आहेत. काहींची स्थिती तर अत्यंत नाजूक आहे. कोंडवाड्यात प्रचंड घाण आहे. बसण्यासाठी योग्य जागा नाही. जनावरे रात्रंदिवस उभी राहतात. त्यांची शारीरिक स्थिती खालावली आहे. ग्रा.पं. प्रशासनाच्या चुकीमुळे ही परिस्थिती जनावरांवर ओढवली आहे.-आशिष भटारकर, सामाजिक कार्यकर्ता, कोठारीपोलिसांनी ताब्यात घेतलेली जनावरे ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. यातील काही जनावरे आधीच आजारी होती. कोंडवाड्याची क्षमताही कमी आहे. पण विशेष काळजी घेणे सुरू आहे.- एल. वाय. पोहरे, ग्रामविकास अधिकारी, कोठारी
१८ दिवसांपासून २८ जनावरे चारा-पाण्याविना कोंडवाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:16 AM
मागील अठरा दिवसांपासून कोठारी येथील कोंडवाड्यात २८ जनावरांना बंदिस्त करण्यात आले. ग्रामपंचायतकडून जनावरांना चारापाण्याची व्यवस्था केली नाही. जनावरांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने एका गाईचा मृत्यू झाला तर काही जनावरे मृत्यूच्या दारावर आहेत.
ठळक मुद्देएका गाईची मृत्यू : ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष