लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने १८ प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता चिचपल्ली येथील पोलीस ठाण्यासमोर घडली. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील केवळ एकच इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.चंद्रपूर वरून एम एच ३४ ए बी ८३८६ क्रमांकाची महाकाली ट्रॅव्हल्स मूल कडे जात होती. दरम्यान, मूलवरून टीएन ५२ जे १११९ चा टक चंद्रपूरकडे येत होता. चिचपल्ली येथील पोलीस ठाण्यासमोर या वाहनांमध्ये धडक झाली. यात १८ प्रवासी जखमी झाले. सविता मुजुमदार (४०), ईश्वरी आत्राम (५), रूपाली आत्राम (२५), मंगेश आत्राम (२७), अभिषेक जुमनाके (१८), जितेंद्र नैताम (२८), सुधाकर पेंदोर (४६), सरस्वती मुजुमदार (३०), वत्सलाबाई (६५), श्रीकृष्ण आत्राम, गणपत गेडाम, मारोती कवाडे, यादव जोंदडे, सुर्यभान बावणे, लक्ष्मण तांगडे अशी जमखींची नावे आहे. काहींना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली.टिप्परच्या धडकेत दोघे जखमीसिंदेवाही : येथून नागपूरकडे जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजता पळसगावजवळ घडली. दिलीप मोहन राऊत (२३) आकाश सोमाजी नगराळे (२१) रा. मूल अशी जखमींची नावे आहेत. रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना जिलहा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार पढाल, फौजदार लेनगुरे, कावळे करीत आहेत. मागील पंधरा दिवसांपासून कळमगाव घाटातून रेतीची वाहतूक सुरू आहे. शेकडो टिप्पर भर वेगाने या मार्गाने धावतात. बहुतांश चालक मद्यप्राशन करून वाहने दामटत असल्याने अपघात होत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
ट्रक ट्रॅव्हल्स अपघातात १८ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 10:59 PM
ट्रॅव्हल्स व ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने १८ प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता चिचपल्ली येथील पोलीस ठाण्यासमोर घडली. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील केवळ एकच इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
ठळक मुद्देचिचपल्ली येथील घटना : जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार