लोकमत न्यूज नेटवर्कघोसरी : ट्रकमध्ये जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असताना नांदगाव बस थांब्यालगत नागरिकांच्या सर्तकतेमुळे बेंबाळ पोलिसांनी १८ जनावरांची सुटका केली. त्यातील १६ जनावरांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. तर एकाची प्रकृती स्थिर नसल्याने बाहेरच व दुसरे एक जनावर मृत्यूच्या घटका मोजत आहे.बेंबाळ-गोंडपिपरी मार्गे आंध्र प्रदेशात गुरांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. २ जुनला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास नांदगाव बस थांब्यालगत टीएस १२ युबी ८०३२ या क्रमांकाच्या ट्रकला अडवून येथील नागरिकांनी पहाणी केली असता, जनावरांची तस्करी होत असल्याचे आढळून आले. लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक ताब्यात घेतले व १८ जनावरांची सुटका केली. चालक-मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बेंबाळ ग्रामपंचायत येथील कोंडवाड्यात ३० जनावरे ठेवण्याची सोय असली तरी केवळ १६ गुरे ठेवली आहे. मात्र दोन जनावरांची प्रकृती स्थिर नसल्याने एक बाहेर बांधून तर दुसरा मृत्यूच्या घटका मोजत आहे.
कत्तलीसाठी नेणाऱ्या १८ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 10:28 PM
ट्रकमध्ये जनावरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असताना नांदगाव बस थांब्यालगत नागरिकांच्या सर्तकतेमुळे बेंबाळ पोलिसांनी १८ जनावरांची सुटका केली. त्यातील १६ जनावरांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले आहे. तर एकाची प्रकृती स्थिर नसल्याने बाहेरच व दुसरे एक जनावर मृत्यूच्या घटका मोजत आहे.
ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : जनावरे बेंबाळच्या कोंडवाड्यात