लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते चंद्रपूर महानगरपालिकेच्या आपले सरकार सेवा कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या सेतू केंद्रातून विविध प्रकारच्या १८ सेवा नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. उद्घाटन कार्यालयानंतर लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते डिजिटल जन्म नोंदणी दाखल्याचे वाटप करण्यात आले.लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय सेवा हक्क आयोगाच्या कायद्याच्या अंमलबजावणीची पाहणी करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी त्यांनी वरोरा येथे सेतू केंद्र, तहसील कार्यालय व आनंदवन ग्रामपंचायतीमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीची पाहणी केली. प्रत्यक्ष नागरिकांमध्ये जाऊन त्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणीबाबत चर्चा केली. चंद्रपूर येथे मंगळवारी सकाळी त्यांनी सर्व विभागप्रमुखांना बोलवून प्रत्येक विभागाला या कायद्याच्या अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणीबाबत विचारणा केली. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर प्रशासनाच्या गतिशीलतेत प्रचंड वाढ झाल्याची माहिती त्यांना बैठकीमध्ये मिळाली.मनपातील झोन क्रमांक तीनमध्ये महानगरपालिकेने बहुराष्ट्रीय बँकेसारख्या अद्यावत सेवा केंद्राची सुरुवात केली आहे. या सेवाकेंद्रातून या परिसरातील जनतेला किमान १८ सुविधांचा लाभ मिळणार आहे. या सेवाकेंद्राच्या उद्घाटनानंतर लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी स्वत: एका अर्जदाराला पहिल्या प्रमाणपत्राचे वितरण केले. दरम्यान चंद्रपूर ठिकाणच्या भेट वहीमध्ये त्यांनी ही आठवण देखील नमूद केली. मनपा आयुक्त संजय काकडे यांनी सेवा हक्क कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या या संपूर्ण संगणीकृत कार्यालयासाठी त्यांचे आभार मानले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपायुक्त सचिन पाटील, विजय देवळीकर, सरनाईक यांच्यासह मनापाचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनपाच्या सेवा कार्यालयातून मिळणार १८ प्रकारच्या सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:34 PM
लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते चंद्रपूर महानगरपालिकेच्या आपले सरकार सेवा कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या सेतू केंद्रातून विविध प्रकारच्या १८ सेवा नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत. उद्घाटन कार्यालयानंतर लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते डिजिटल जन्म नोंदणी दाखल्याचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देसेवा कार्यालयाचे उद्घाटन : नागरिकांचे काम सोईस्कर होणार