सिंदेवाहीमार्गे मूलकडे एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये अवैधरीत्या दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून मूल उमा नदी पुलाजवळ नाकेबंदी केली असता सिंदेवाहीकडून एका पांढऱ्या रंगाची टाटा बोल्ट गाडी क्रमांक एम. एच. ३४ ए. एम. ७३५१ येताना दिसली. गाडीला थांबवण्यात आले व गाडीची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली. याप्रकरणी अंकुश नंदकिशोर बोडके रा. मूल याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तर दुसऱ्या घटनेत गडीसुर्ला टी पाईंटजवळ येसगाव मार्गे एका पांढऱ्या रंगाच्या गाडीला थांबविले असता तिथेही दारू आढळून आली. यात ज्ञानदीप ऊर्फ कालू विजय मसराम रा. डोंगरगाव याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही कारवाईत वाहनांसह एकूण १९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस.आर. राजपूत करीत आहेत.
दोन कारवायात १९ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:21 AM