महापौर राखी कंचर्लावार यांनी दिव्यांग भावंडांच्या घरी भेट दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त रामनगर प्रभागातील मित्रनगर येथील संजय डवरे व मंजूषा डवरे या दोन भावंडांना सानुग्रह निधीबद्दल प्रमाणपत्र प्रदान करून सन्मान उपक्रमाचा प्रारंभ केला. चंद्रपूर मनपा क्षेत्र अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या दिव्यांग नागरिकांना मनपातर्फे दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत सानुग्रह निधी आहे. एकूण १२५७ लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये २ कोटी ८५ लाख ६८ हजार ६०८ रुपयांचा निधी आरटीजीएसद्वारे अदा केला आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार दिव्यांगांच्या घरी भेट देणार आहेत. रामनगर प्रभागातील मित्रनगर येथील आंबेडकर कॉलेजजवळ आकाशवाणी केंद्र मार्गावर डवरे यांचे घर आहे. आज चाळिशी ओलांडलेले दोघेही भावंडं जन्मतः दिव्यांग आहेत. स्वतःहून शारीरिक हालचाली करू शकत नाही. वृद्ध आई-वडील उदरनिर्वाह आणि देखरेख करीत असतात. १०० टक्के दिव्यांग असलेल्या संजय डवरे व मंजूषा डवरे या दोन भावंडांना सानुग्रह निधीबद्दल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, झोन सभापती छबू वैरागडे, नगरसेविका शीतल आत्राम यांची उपस्थिती होती.
१२५७ दिव्यांगांना २ कोटी ८५ लाख ६८ हजारांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:33 AM