शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

२० लाखांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 9:59 PM

नागपूर-चंद्रपूर मूल मार्गावरील ट्रॅव्हल्समधून विदेशी दारूसाठा तर नोकरी या गावाजवळ वाहनातून देशी दारू असा एकूण २० लाख ७२ हजार रुपयांचा दारूसाठा भद्रावती पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. यातील आरोपी हा अल्पवयीन आहे. दर दुसऱ्या कारवाईतील आरोपी पसार झाला.

ठळक मुद्देअल्पवयीन ताब्यात : भद्रावती पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : नागपूर-चंद्रपूर मूल मार्गावरील ट्रॅव्हल्समधून विदेशी दारूसाठा तर नोकरी या गावाजवळ वाहनातून देशी दारू असा एकूण २० लाख ७२ हजार रुपयांचा दारूसाठा भद्रावती पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. यातील आरोपी हा अल्पवयीन आहे. दर दुसऱ्या कारवाईतील आरोपी पसार झाला.नागपूर-चंद्रपूर महामार्गावर चंद्रपूरकडे येणाºया ट्रॅव्हल्समधून दारूसाठा आणण्यात येत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी हिंदुस्थान ट्रॅव्हल्स एम. एच. ४० वाय ६५६९ या वाहनाची तपासणी करुन ट्रॅव्हल्सच्या मागच्या डिक्कीतून ७२ हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तर दुसºया कारवाईत तालुक्यातील घोसरी या मार्गालगत चंदनखेडा येथे पिकअप वाहन एम. एच. ४९, ६१३१ या वाहनाची तपासणी करुन २० लाखांचा देशी दारूसाठा व वाहन ताब्यात घेतले. मात्र यातील आरोपी पसार झाला. या दोन्ही कारवाईत एकूण २० लाख ७२ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला.ही कारवाई ठाणेदार बी.डी. मडावी, सपोनि अनिल आळंदे, नरेश शेरकी, राजू बेलेकर, फैयाज शेख, तनूज टेकाम, सचिन गुरनुले, हेमराज प्रधान, नाना अंगतवार यांनी केली.