लोकमत न्यूज नेटवर्कमूल/सुशी दाबगाव : गोंदियावरून गणेशपुरी (आंध्रप्रदेश) येथे गुरांना घेऊन जाणारे ट्रक मूल पोलिसांनी चिरोली ते सुशी मार्गावर अडविले. यावेळी नऊ ट्रकांमधून २०७ गुरांची सुटका करण्यात आली. सदर कारवाई सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास करण्यात आली. यात आठ आरोपींना मूल पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातून आंध्रप्रदेशात जनावरांची मोठया प्रमाणावर तस्करी सुरू असल्याची बोंब मागील अनेक दिवसांपासुन सुरू होती, मंगळवारी रात्री सुशी मार्गे जनावरांची ट्रकमधून तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मूल पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे मूल पोलिसांनी सुशी मार्गावर गस्त ठेवली होती. रात्री २ वाजताच्या सुमारास नऊ ट्रक एकामागून एक येत होते. सहायक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे यांनी सर्व ट्रक अडवून पाहणी केली असता ट्रकांमध्ये जनावरे कोंबून असल्याचे दिसून आले. या नऊ ट्रकांमध्ये एकूण २०७ जनावरे होती. त्यांना गणेशपुरी येथे नेले जात होते. जनावरांची किंमत दोन लाख ७० हजार रुपये आहे तर वाहनांची किंमत ८६ लाख रुपये आहे. जनावरांची सुटका करून मूल तालुक्यातील चिखली, राजोली, डोंगरगाव, सुशी, चिरोली येथील कोंडवाडा आणि गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.मूल पोलिसांनी वाहन चालक आसीफ मुस्तफा पठाण (२४), अमर संतोश पडोळे (३२), अमीर खान जमीर खान पठाण (२६), सचीन ताराचंद गडकर (३०) ईष्वर सदाशिव देशमुख (३२) सर्व रा. अड्याळ ता. पवनी, प्रवीण नामदेव गुडदे (३२) रा. टेकानाका नागपूर, शेख मोहसीन शेख नासीर (२५) रा. कामठी नागपूर, मो. सोहेल मो. फारूख शेख (२८) रा. महेंद्रनगर, नागपूर यांच्यावर कलम ५, ५ (अ),५ (ब), महाराष्टÑ प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, पोलीस हवालदार अकबर पठाण, सुरेश पडयाळ, रमेश झाडे, सुरेश ज्ञानबोनवार, आनंद गांगरेड्डीवार, मुकेश गजबे, राजेश शेंडे करीत आहेत.
वाहनात कोंबलेल्या २०७ गुरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:46 AM
गोंदियावरून गणेशपुरी (आंध्रप्रदेश) येथे गुरांना घेऊन जाणारे ट्रक मूल पोलिसांनी चिरोली ते सुशी मार्गावर अडविले. यावेळी नऊ ट्रकांमधून २०७ गुरांची सुटका करण्यात आली. सदर कारवाई सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
ठळक मुद्देमूल पोलिसांची कारवाई : आठ जणांना अटक, एक फरार