शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

२१ दिव्यांग जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 10:31 PM

आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा यांच्या पुढाकाराने स्व. गौरव पुगलिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुगलिया कुटुंबाच्या वतीने दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. यातून दिव्यांग बांधवांचे आयुष्य आणखी सुदृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे, ही बाब गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन माजी खासदार गेव्ह आवारी यांनी केले.

ठळक मुद्देआस्था व पुगलिया परिवारातर्फे सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा यांच्या पुढाकाराने स्व. गौरव पुगलिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुगलिया कुटुंबाच्या वतीने दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. यातून दिव्यांग बांधवांचे आयुष्य आणखी सुदृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे, ही बाब गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन माजी खासदार गेव्ह आवारी यांनी केले.चंद्रपूर येथील एका खासगी लॉनमध्ये आयोजित या दिव्यांगांच्या सामूहिक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी २१ दिव्यांग जोडपी विवाहबध्द झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अनिस अहमद, राहुल पुगलिया, निलम राचर्लावार आदी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री अनिस अहमद यांनी ट्रस्ट आणि पुगलिया परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे कौतुक केले. मान्यवरांच्या भाषणानंतर जिल्ह्यातील विविध गावातील २१ दिव्यांग जोडप्यांचा त्यांच्या रितीरिवाजानुसार विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर प्रत्येक जोडप्यांना आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट व पुगलिया परिवाराच्या वतीने संसार उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. मागील १४ वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू असून आतापर्यंत सुमारे तीनशे जोडपी अशा सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द झाली आहेत. यावेळी नरेंद्र पुगलिया, नगिना पुगलिया, अरुण बाफना, गुंजन बाफना, संस्थाध्यक्ष संजयकुमार पेचे, आतिश आक्केवार, महेश भगत आदी उपस्थित होते.