जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २६ हजार ७०१ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ५४२ झाली आहे. सध्या १७४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ६५ हजार ९६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ३४ हजार ५०१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यांमध्ये पंचशील वार्ड, गोंडपिपरी येथील ५६ वर्षीय पुरूष व चंद्रपुरातील म्हाडा कॉलनी निवासी ८२ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
चंद्रपुरात ७०, वरोरात २३ रूग्ण
आज बाधित आढलेल्या २१२ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ७०, चंद्रपूर तालुका १४, बल्लारपूर १३, भद्रावती १८, ब्रह्मपुरी चार, नागभीड १२, सिंदेवाही सहा, मूल नऊ, सावली तीन, गोंडपिपरी एक, राजूरा १६, चिमूर १७, वरोरा २३, कोरपना चार व इतर ठिकाणच्या दोन रूग्णांचा समावेश आहे.