शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

२२ हजार शौचालयांची होणार जिल्ह्यात निर्मिती

By admin | Published: November 18, 2014 10:51 PM

देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या

जागतिक शौचालय दिन : शौचालय बांधकाम करून वापर केल्यास सुटणार आरोग्याच्या समस्यासाईनाथ कुचनकार - चंद्रपूरदेशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत समाजातील सर्व घटक कामाला लागले आहे. आजही गावागावांत पाहिजे तशी स्वच्छता झाली नाही. अस्वच्छतेमुळे अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादूर्भाव होतो. तो टाळण्यासाठी स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. उघड्यावर शौचास बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादूभाव होतो. प्र्रत्येकांनी शौचालयाचा वापर केल्यास विविध रोगांपासून मुक्ती मिळू शकते. मात्र त्यासाठी स्वत:ची मानसिकता असणे गरजेचे आहे.यावर्षी जिल्हा परिषदेने जिल्ह्यात तब्बल २२ हजार ७७ शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट हातात घेतले आहे. यातील ६ हजार शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा वापरही नागरिकांनी सुरु केला आहे. शासनस्तरावर शौचालय बांधकाम आणि वापरासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र आजही काही नागरिक शौचालयाच्या बांधकाम आणि वापराबाबत उदासिनता दाखवितात. २०१३-१४ या वर्षामध्ये जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतींनी निर्मल ग्राम पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर केले आहे. मात्र ही संख्या फारच तोकडी आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात यावर्षी एपीलसाठी २ हजार ५९३, बीपीएल २ हजार ३६५, विद्यालय १ हजार ५८६, तर अंगणवाडी केंद्रामध्ये २ हजार २७७ शौचालय बांधण्यात येणार आहे.ग्रामीण तसेच शहरी भागातील काही परिसरामध्ये शौचालयाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे नागरिक गावातील रस्त्याच्या कडेला शौचास बसतात. त्यामुळे गावाभोवती, विष्ठा साचते. दररोज कुजणाऱ्या या विष्ठेमधील घातक वायू बाहेर पडतात व ते गावात पसरतात. त्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो.पशु-पशी व मानवी विष्ठा रोगजंतुच्या अस्तीत्वामुळे अत्यंत घातक असते. त्यामुळे ती ताडबतोड जमिनीमध्ये गाढल्याशिवाय पर्याय नाही. मात्र असे न केल्यामुळे रोगांना आमंत्रण मिळते. यामुळेच शौचालयाचा वापर केल्यास यापासून सुटका मिळू शकते. मानवी विष्ठेमध्ये जंताची अंडी तसेच इतर रोगजंतू असतात. ही अंडी शौचाला गेलेल्या माणसाच्या पायाबरोबर, शौचालयाला नेलेल्या पाण्याच्या तांब्याबरोबर तसेच मातीत खेळणाऱ्या मुलांच्या हातापायाला लागतात. लागलेल्या मातीबरोबर पिण्याच्या पाण्यात व अन्नात मिसळतात व ते पोटात गेल्यामुळे मुलांना जंत होतात. त्यामुळे नाहक औषधोपचार करावा लागतो. शौचास बाहेर जाण्यामुळे अंधारात पाय घसरून पडणे, हात पाय मोडणे डोक्याला मार लागने असे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी शौचालयाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. महिलांना दिवसा शौचास जाणे सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे त्या पहाटे किंवा रात्री अंधारात शौचास जाणे पसंत करतात. त्यामुळे बराचकाळ विष्ठा पोटात साठून राहते व त्यातील जंत, जिवाणू, विषाणू आतड्यावर हल्ला करतात. त्यामुळे पोटात दुुखण्यास सुरुवात होते. अपचन होते. विष्ठा पोटात साठण्याने महिलांना नेहमी पोटाचे आजारामध्ये वाढ होते. वाशिम जिल्ह्यातील महिलेने शौचालय बांधकामासाठी स्वत:चे मंगळसूत्र विकले. तिच्यासारखीच जिद्द प्रत्येक महिलांनी केली तर, जिल्हा निर्मल होणार हे मात्र नक्की.