जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ८२ हजार १० वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७६ हजार ७२८ झाली आहे. सध्या ३ हजार ८५९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ६३ हजार ६९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ७८ हजार ८६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४२३ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील १३१९, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३७, यवतमाळ ४८, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, कोरोनाची लस घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृत
आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील दाताळा येथील ६२ वर्षीय पुरूष, ५१ व ५५ वर्षीय पुरूष, पडोली येथील ६५ वर्षीय पुरूष, भद्रावती तालुक्यातील ४६ व ५६ वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील ६५ वर्षीय पुरूष, नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील ६५ वर्षीय महिला, ५५ वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील २८ वर्षीय महिला, पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथील ६५ वर्षीय महिला, गडचांदूर येथील ६३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तालुकानिहाय रूग्ण
चंद्रपूर मनपा क्षेत्र ५६
चंद्रपूर तालुका १७
बल्लारपूर २७
भद्रावती ३७
ब्रह्मपुरी ०३
नागभीड ०२
सिंदेवाही १०
मूल १४
सावली ०५
पोंभूर्णा ०८
गोंडपिपरी १३
राजूरा ०२
चिमूर ०१
वरोरा ०८
कोरपना १५
जिवती ०१
इतर ०१