बॉक्स
विषयानुसार असे झाले आचार्य
विज्ञान शाखेत गेल्या पाच वर्षांत ९१ जणांनी पीएच.डी. प्राप्त केली. यामध्ये गणित १५, रसायनशास्त्र १७, भाैतिकशास्त्र ८, काॅम्पुटर सायन्स ८, इलेक्ट्राॅनिक इंजिनिअरिंग १, प्राणीशास्त्र १६, पर्यावरण २, मायक्राेबायलाॅजी ८, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ३, बाॅटनी ९, मायनिंग इंजिनिअरिंगच्या ४ जणांचा समावेश आहे.
मानव विद्या शाखेतील भूगाेल ६, राज्यशास्त्र ९, अर्थशास्त्र ८, समाजशास्त्र ६, मराठी १०, इंग्रजी १४, हिंदी २, विधी ४, मास कम्युनिकेशन १, इतिहास ४, पाॅली २, तसेच वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील १८, तसेच अंत:विषय अभ्यास शाखेतील ५३ जणांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे.
कोट
काय आहेत अडचणी
गाेंडवाना विद्यापीठाकडे आपण रीतसर नाेंदणी करून प्राणीशास्त्र विषयात पीएच.डी. मिळविण्यासाठी अभ्यास व संशाेधन सुरू आहे. विद्यापीठ व तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळाेवेळी लाभत असल्याने सध्या काेणतीही अडचण जाणवत नाही. जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जाेरावर आपण यशस्वीरीत्या पीएच.डी. मिळवू.
- सचिन येनगंधलवार, प्राध्यापक
गाेंडवाना विद्यापीठाकडे पीएच.डी.सीठी नाेंदणी केली असून, संशाेधन सुरू आहे. राज्यशास्त्र विषयात हे काम सुरू असून, गडचिराेली येथील तज्ज्ञ प्राध्यापक माझे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडून आपणाला वेळाेवेळी मार्गदर्शन मिळत आहे. शंकांचे निरसन हाेत आहे.
- बुलबुल वाळके, प्राध्यापक
स्थानिकस्तरावर विद्यापीठ झाल्यामुळे पीएच.डी. करणे साेपे झाले आहे. नाेंदणी केल्यानंतर संशाेधन व अभ्यासाला सुरुवात केली जाते. तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून आवश्यक ते मार्गदर्शन घेऊन आपण सातत्याने त्या दिशेने प्रयत्न करीत आहे. अध्यापनासाेबतच संशाेधनाकडे आपले पूर्ण लक्ष आहे.
- लाेमेश बावनकुळे, प्राध्यापक.