लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर नगरपालिका नवनिर्मित असून दोन-अडीच वर्षाच्या काळात वेगवेगळ्या योजना व विविध माध्यमातून मिळालेल्या विकास निधीतून शहराचा विकास सुरू आहे. येथे २४ तास पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली आहे. लवकरच ही योजना कार्यान्वीत होणार आहे. एटीएम थंड वाटर फिल्टर मशीनच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील. या योजनेचा प्रत्येकानी लाभ घ्यावा, असे आवाहन आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.चिमूर येथे संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या ७०१ व्या पुण्यतिथी निमित्त येथील कुंभार मोहल्ल्यात आयोजित पुण्यतिथी महोत्सवादरम्यान एटीएम वॉटर फिल्टर मशीनचे लोकार्पण व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते वसंत वारजूकर, भाजप तालुकाध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, महामंत्री विनोद अढाल, स्थायी समिती सभापती छाया कंचलवार, बकाराम मालोदे, बंडू जावळेकर, नारायण चौधरी, प्रफुल्ल कोलते, रमेश कनचलवार, कैलास धनोरे, समीर राचलवार, संजय कुंभारे, मनीस नाईक, शरद गिरडे, गोलू भरडकर, एकनाथ थुटे आदी उपस्थित होते. शासनाने कुंभार समाजासाठी मातीकला बोर्डाची घोषणा केली, त्याबद्दल आ. कीर्तीकुमार भांगडीया यांचा कुंभार युवा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संचालन व आभार गणपत खोबरे यांनी केले.
चिमूरवासीयांसाठी २४ तास पाणी पुरवठा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 10:15 PM
चिमूर नगरपालिका नवनिर्मित असून दोन-अडीच वर्षाच्या काळात वेगवेगळ्या योजना व विविध माध्यमातून मिळालेल्या विकास निधीतून शहराचा विकास सुरू आहे. येथे २४ तास पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली आहे.
ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडीया : एटीएम वॉटर फिल्टर मशीनचे लोकार्पण