शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सात महिन्यात जिल्ह्यात २४ खून

By admin | Published: June 14, 2014 11:26 PM

गेल्या सात महिन्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात २४ खून झालेत. यातील सर्वाधिक हत्या कौटुंबिक कारणातून झाल्या आहेत. जानेवारी ते जून या सात महिन्यांतील पोलीस दप्तरातील आकडेवारीवर नजर फिरविली असता,

गुन्हेगारी फोफावतेय: कौटुंबिक कारणातून सर्वाधिक हत्याचंद्रपूर : गेल्या सात महिन्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात २४ खून झालेत. यातील सर्वाधिक हत्या कौटुंबिक कारणातून झाल्या आहेत. जानेवारी ते जून या सात महिन्यांतील पोलीस दप्तरातील आकडेवारीवर नजर फिरविली असता, हे वास्तव पुढे आले. जिल्ह्यातील चिमूर व सावली तालुक्यातील सर्वाधिक खुनाच्या घटना घडल्या आहेत, तर जिवती आणि कोरपना तालुक्यात सात महिन्यांच्या कालावधीत हत्येची एकही घटना घडली नाही, हे विशेष.चंद्रपूर जिल्हा हा उद्योगाने व्यापलेला जिल्हा आहे. त्यामुळे परप्रांतिय मजूर वर्ग येथे मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख मोठा असला तरी घटना उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाली आहे. शुक्रवारी सकाळी चंद्रपुरातील मुख्य मार्गावर असलेल्या मनपाच्या राजे धर्मराव विद्यालयाच्या मागील इमारतीच्या बोळीत एका इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा तपास काही तासांतच उरकवून आरोपीला जेरबंददेखील केले. जिल्ह्यात सात महिन्यांच्या कालावधीत २४ खुनाच्या घटना घडल्या. त्यात चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, सावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोखाळा, किसाननगर, चकपिरंजी, सावली येथे प्रत्येकी एक खुनाची घटना घडली. या सर्व घटना उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या चार घटना घडल्या. खांबाडा, मुरपार, तळोधी (नाईक), वडाळा या गावांमध्ये या घटना घडल्या. या सर्व घटना उघडकीस आल्या. आरोपींना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)