गडीसुर्ला : जि.प. शाळेतील डिजिटल खोलीचे उद्घाटन मूल : पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या बेंबाळ बिटातील २४ शाळा प्रगत व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसुर्ला येथील डिजिटल वर्ग खोलीचे उद्घाटन कार्यक्रम नुकताच गडीसुर्ला येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच चेतनाताई येनूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती मूलचे गटशिक्षणाधिकारी महादेव बावणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक ठाकरे, उपाध्यक्ष प्राजक्ता भसारकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर, ग्रामपंचायतीचे सदस्य ललीत मोहुर्ले, संजय येनूरकर, पुजेश्वर मोहुर्ले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मंगेश आकनपल्लीवार, आंचल आंबटकर, प्रतिभा कस्तुरे, ज्योती लहामगे, फरिदा शेख, कुंदा लेनगुरे, पुष्पा राऊत, अशोक बुटले, नारायण वाढई, सूर्याजी सोपनकर, पोलीस पाटील प्रतिभा लहामगे, शाळेचे मुख्याध्यापक मनोज शेरकी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकसहभागातून मिळालेल्या तीन टी.व्ही. डिजिटल संचाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बेंबाळ बिटातील २४ शाळा डिजिटल झाल्याचे घोषित करण्यात आले. या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वरचित ‘शब्द तरंग’ या कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
बेंबाळ शैक्षणिक बिटातील २४ शाळा झाल्या प्रगत
By admin | Published: April 03, 2017 2:02 AM