मनोज गोरे ।ऑनलाईन लोकमतकोरपना: तालुक्याची निर्मिती होऊन २५ पूर्ण झाले. या कालावधीमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बसस्थानक उभारु, असे गाजर दाखविले. मात्र, सर्वांनीच या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. ऊन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता प्रवाशांना नाईलाजास्त रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली आहे़कोरपना तालुक्यातील निर्मिती झाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. हा तालुका आदिवासी बहुल आहे. पहाडावर भ् आदिवासी भटक्या जमातीची संख्या अधिक असून विकासाच्या प्रवाहात या जमाती मागे पडल्या आहेत़ प्रशासकीय रचना आणि विकासाची कामे यामध्ये संतुलन ठेऊन मूलभूत समस्या सुटतील, अशी अपेक्षा होती मात्र, २५ वर्षांनंतरही या समस्या जैसे- थे आहेत. पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि विविध विभागांचे कार्यालय थाटण्यात आले, पण प्रत्यक्षात विकास कोसो दूर आहे. तेलंगण व आंध्र प्रदेशाला जवळ असलेला हा तालुका मानसिकदृष्ट्या महाराष्ट्रात आणण्यासाठी ठोस विकास कामांची गरज आहे. दळणवळणाची साधन आज गतिमान झाली आहेत़चंद्रपूर बसस्थानकातून अनेक गाड्या कोरपना, जिवती तालुक्यात सोडली जातात. त्यानंतर या दोन्ही तालुक्यातून तेलगंणा व आंध्र प्रदेशात सहजपणे संचार करता येते. परंतु कोरपना शहरात तात्पुरता प्रवाशी निवारा उभारुन राज्य परिवहन महामंडळाने नागरिकांच्या अपेक्षांवर बोळा फिरविला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेदेखील बसस्थानकाच्या प्रश्नावरुन कधी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले नाही. त्यामुळे बसस्थानकाचा प्रश्न २५ वर्षांपासून रेंगाळला आहे. बसस्थानकच नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.रस्त्यावरच करावी लागते बसची प्रतीक्षातालुक्यातील अनेक गावांमध्ये महामंडळाच्या बसेस सोडल्या जातात़ परंतु प्रवाशी निवारा उभारण्यात आला नाही. परसोडा, गोविंदपूर, दुर्गाळी, महेंदी, पारडी, कन्हाळगाव, चोपण, रुपापेठ, नारडा, सोनुर्ली, आसन, धामनगाव, इचापूर येथे प्रवाशी निवारा नसल्याने नागरिकांना रस्त्यावर उभे राहावे लागत आहे़ पावसाळ्यात झाडांचा आश्रय घ्यावा लागतो़सरकारविरुद्ध रोषकोरपना शहरात सुसज्ज बसस्थान बांधण्याचे स्वप्न हवेत विरले. हा प्रश्न केव्हा सुटेल हे कुणीही ठामपणे सांगत नाही. तर दुसरीकडे ज्या तात्पुरत्या निवाºयात प्रवाशी थांबत होते़ तो देखील पाडण्यात आला. नागरिकांचा अपेक्षाभंग झाल्याने सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे़
२५ वर्षांपासून बसस्थानक कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:25 PM
तालुक्याची निर्मिती होऊन २५ पूर्ण झाले. या कालावधीमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बसस्थानक उभारु, असे गाजर दाखविले. मात्र, सर्वांनीच या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले आहे.
ठळक मुद्देतालुकावासीयांमध्ये संताप : मुख्य मार्गावरील अनेक गावांत नाही प्रवाशी निवारा