नायब तहसीलदारांचे चार पद रिक्त : ग्रामपंचायत निवडणुकीने तहसीलदारांची कसरतराजकुमार चुनारकर खडसंगीमहसूल विभागाचा संबंध प्रत्येक नागरिकांशी येतो. त्यामुळे महसूल विभागाशिवाय कुठलेही काम सुटत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या चिमूर तहसील कार्यालयांतर्गत २ लाख ८९ हजार लोकसंख्या आहे. मात्र येथील नायब तहसीलदारांची चार पदे रिक्त असून एकट्या तहसीलदारांनाच तालुक्यातील नागरिकांची कामे पार पाडावी लागत आहेत. यातच पुढच्या महिन्यात तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवणूका होणार असल्याने एकाच अधिकाऱ्याची चांगलीच कसरत होणार आहे. तहसील कार्यालयाअंतर्गत शेतकऱ्यांना सातबारा, फेरफार, इंदिरा गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, अन्नपुरवठा विभाग, विद्यार्थ्यांचे जातीचे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र असे अनेक कामे होतात. त्यामुळे तालुक्यातील २५९ गावातील नागरिकांना तहसील कार्यालयात यावे लागते. चिमूर तहसील कार्यालयात पाच नायब तहसीलदारांचे पदे मंजूर आहेत. मात्र चार नायब तहसीलदारांचे पदे आजही रिक्त आहेत. एक नायब तहसीलदार आहेत, तेही परिविक्षाधिन असून ते काही महिन्यात पुरतेच आहेत. त्यामुळे सर्व योजनाच्या कामाचा बोझा एकट्या मुख्य तहसीलदाराच्या खांद्यावर आहे.तहसील कार्यालयात निराधार योजनाचे लाभार्थी दररोज येतात. तसेच उत्पन्नाचे दाखले, रेशनकार्ड, जातीचे दाखले, रहिवाशी दाखले, निवडणुक प्रक्रियेचे कामे, अन्नपुरवठा विभागाशी निगडीत कामे असतात. या कामासाठी दररोज शेकडो पक्षकार कार्यालयात येतात. नायब तहसीलदार नसल्याने सर्व कामे मुख्य तहसीलदारांना करावे लागत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनाही बराच वेळ ताटकळत थांबावे लागते. अनेक लाभार्थी वेळेमुळे परतीचा मार्ग पकडतात. मुख्य तहसीलदारांना सभा किंवा दौरा असला तर त्या दिवशी मोठे फाईलचे गठ्ठे पडले असतात.सध्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली असून विद्यार्थ्यांचे अकरावी, बी.ए., मेडिकल, इंजिनिअरींग इत्यादी प्रवेशासाठी तहसील कार्यालयातून अनेक प्रमाणपत्र घ्यावे लागत आहेत. प्रमाणपत्र वेळेवर मिळाले नाही तर अनेकांना प्रवेशापासून किंवा दुसऱ्या सुविधेपासून वंचित राहण्याची वेळ येवू शकते. मात्र एवढी गंभीर बाब असूनही अनेक महिन्यापासून कार्यालयात नायब तहसीलदारासह अनेक कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त आहेत. यावर मात्र तालुक्यातील राजकीय पुढारी गप्प बसले असून तर जनता कार्यालयाचे दररोज उंबरटे झिजवित आहेत.चिमूर तालुक्यातील ८२ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने बऱ्याचश्या उमेदवारांना जातीच्या दाखल्यापासून इतरही प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे ते सुद्धा कार्यालयात येवून गर्दी करतात. गाव खेड्यातील राजकीय पुढारी कार्यालयात येवून ‘इलेक्शन का काम है’ जल्दी दो’ असे म्हणून आपले काम करतात. मात्र गरीब लाभार्थ्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होते. मात्र हेच पुढारी येत्या काही दिवसात याच सामान्य नागरिकांकडे मताचा जोगवा मागायला जाणार आहेत. प्रशासनाने चिमूर तहसील कार्यालयात रिक्त असलेले पदाची भरती करून नागरिकांना कामासाठी होणारा त्रास दूर करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.भिसी नायब तहसीलदार कार्यालय नावापुरतेच निवडणुकीच्या रणधुमाळीतही चिमूर तालुक्यात चक्क चार नायब तहसीलदाराची पदे रिक्त आहेत. त्यामध्ये या कार्यालयाचा कारभार कसा असेल व पदस्थ असलेले अधिकारी कसे हाताळत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. चिमूर तालुक्यात महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी भिसीला नायब तहसीलदार कायाललयाचे उद्घाटन केले. मात्र चिमूरच्या तहसील कार्यालयातच नाही तर भिसीसाठी अधिकारी कुठून येईल, हा प्रश्नही आवासून उभा आहे. पाच मंजूर नायब तहसीलदारांच्या पदांपैकी चार पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा व्याप वाढला आहे. ही बाब वरिष्ठांना कळवली आहे. नागरिकांना त्रास होवू नये म्हणून कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ काम करुन जनतेची अडचण दूर करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. - संतोष महलेतहसीलदार, चिमूर
२५९ गावांचा भार मुख्य तहसीलदारावर
By admin | Published: July 23, 2015 12:46 AM