यात आमदार फंडातून १०, अंबुजा सिमेंटकडून सात, सीएसआर फंडातून पाच, जिल्हा औषधी भंडारकडून चार ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर येथे कार्यान्वित करण्यात आले. याप्रसंगी आ. धोटे यांनी येथे होऊ घातलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या जागेचीसुद्धा पाहणी केली.
यावेळी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, तहसीलदार हरीष गाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुलमेथे, उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, मुख्याधिकारी आर्शिया जुही, अंबुजा सिमेंटचे व्हाइस प्रेसिडेंट संजीव राव, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा कविता उपरे, धनराज चिंचोलकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे, जगदीश बुटले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.