पालकमंत्र्यांचे प्रयत्न : सार्वजनिक बांधकाम विभागाची मदतलोकमत न्यूज नेटवर्कमूल : पोंभूर्णा तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने ना. सुधीर मुनगंटीवार यांनी विविध प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचेही सहकार्य लाभत असल्यामुळे इतर जिल्हा मार्गामधील (इजिमा) २६० किमीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्गामध्ये (प्रजिमा) रूपांतरित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या इतर जिल्हा मार्गाचा विकास करण्यासाठी शासनाकडून पाहिजे त्याप्रमाणावर निधीची उपलब्धता होत नाही, यामुळे २६० किमीचे रस्ते प्रमुख जिल्हा मार्गात रूपांतरित करण्यात आले असून २६० किमीचे रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या मार्गावर आतापर्यंत ४२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून ७० कोटी रुपयाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे, यामुळे मूल उपविभागातील सुमारे २६० किमी रस्त्याच्या रुंदीकरणासोबतच सौंदर्यीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. इजिमा रस्त्याचे रूपांतर प्रजिमामध्ये करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात प्रथम केला असावा असा अंदाज बांधला जात आहे.पेठगाव-मूल-भेजगाव-बेंबाळ मार्ग आधी जिल्हा परिषदेच्या इजिमाचे प्रजिमामध्ये रूपांतर करण्यात आले असून या मार्गासाठी अर्थसंकल्पात ४२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली होती, सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून काम प्रगतीपथावर सुरू आहे. या मार्गावर भेजगावजवळ आठ कोटी रुपये खर्च करून नवीन पुलाचे बांधकाम केवळ सहा महिण्यांत पूर्ण करण्यात आले आहे. इजिमातंर्गत येणारे रस्ते निधी अभावी दुरुस्ती करण्यात येत नाही. यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नरेंद्र बुरांडे यांच्या अथक परिश्रमातून मूल, पोंभूर्णा तालुक्यातील अनेक रस्ते प्रजिमामध्ये रूपांतरित करण्यात आले आहे, यामध्ये प्रजिमा क्रमांक ४९, ५४,२५, ५१ व ५५ क्रमांका २२५ किमीचा रस्ता आहे, या कामासाठी सुमारे ७० कोटी रुपयांच्या खर्च करण्यात येणार आहे.
२६० किमी ‘इजिमा’चे रस्ते झाले ‘प्रजिमा’मध्ये रूपांतरित
By admin | Published: June 26, 2017 12:38 AM