शहरं
Join us  
Trending Stories
1
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
3
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
4
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
5
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
6
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
7
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
8
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
9
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
10
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
11
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
12
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
13
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
14
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
15
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
16
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
17
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
18
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
19
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
20
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं

नागभीड तालुक्यात रोहयोच्या ५६ कामांवर २ हजार ६६७ मजूर

By admin | Published: May 09, 2017 12:35 AM

नागभीड तालुक्यात महात्मा गांधी, म.ग्रा. रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत.

घनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड: नागभीड तालुक्यात महात्मा गांधी, म.ग्रा. रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. तालुक्यात एकूण ५६ ठिकाणी कामे सुरु असून या ५६ कामांवर दोन हजार ६६७ मजूर कार्यरत आहेत.मग्रारोहयो अंतर्गत वृक्ष लागवड, तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, पांदण रस्ते, विहीर, गुरांचे गोठे, शोषखड्डे, शौचालय, घरकुल आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. असे असले तरी तलाव आणि नाला खोलीकरण व पांदण रस्त्यांवर मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे.तलाव व नाला खोलीकरणात आकापूर येथे ५८४ मजूर, बाळापूर (बुज.) ५०० मजूर बाळापूर खुर्द २२७ मजूर, बोंड १५६ मजूर, चिखलगाव ३३५ मजूर, चिंधीचक ४२५ मजूर, देवपायली ५७२ मजूर, ढोरपा ११५० मजूर, खडकी ३०० मजूर, किरमिटी ६२४ मजूर, किटाडी मेंढा ३५६ मजूर, म्हसली ८१८ मजूर, मिथूर ९४० मजूर, मौशी १ हजार ६० मजूर, नांदेड ८४० मजूर, ओवाळा १००० मजूर, पळसगाव खुदर ७५० मजूर, पान्होळी ६४८ मजूर, पांंजरेपार २१९ मजूर, सोनापूर ४२८ मजूर, ५२० मजूर, वाढोणा ६८० मजूर, वासाळा मेंढा ५१९ मजूर असे एकूण १४ हजार ४४५२ मजूर तलाव व नालाखोलीकरणाच्या कामावर कार्यरत आहेत.पांदण रस्त्यामध्येब ाळापूर (बुज.) ५९५, चारगाव २२७, गंगासागर हेटी ३३१, किरमिटी मेंढा ३५१. मजूर, कोसंबी गवळी ५०७ कोटगांव ३४३ मजूर, कोथुळवा ४५२ मजूर, मांगली ३३० मजूर, मांगरुड ४२० मजूर, पारडी ८६५ मजूर, पेंढरी २९० मजूर, सोनुली ४२१ मजूर, वैजापूर २५९ आणि येनोली ३९० मजूर अशा एकूण पाच हजार ७८१ मजुरांना काम मिळाले आहे. याशिवाय मग्रारोहयो अंतर्गत अनेक कामे सुरु असून त्यावरही शेकडो मजूर काम करीत आहेत.नागभीड तालुका उद्योग विरहीत तालुका असून धानाचा हंगाम झाल्यानंतर येथील मजुरांना कोणतीच कामे नसतात. त्यामुळे मजुरांना नाईलाजास्तव रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. पण मग्रारोहयोच्या माध्यमातून आता लोकांना कामे मिळू लागल्याने त्यांच्या हाताला रोजगार प्राप्त झाले. त्यामुळे मजुरांचे होणारे स्थलांतर थांबले आहे.मी आणि पारडी पं.स. सर्कलचे पं.स. सदस्य संतोष रडके दोघे मिळून माझ्या जि.प. क्षेत्रातील विविध कामांना भेटी दिल्या. कामे व्यवस्थित सुरु आहेत. ही कामे सुरु राहण्यास नागभीड पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांचे नियोजन अतिशय उपयुक्त ठरले. मात्र मिंडाळा येथील मजुरांची त्यांना मिळणाऱ्या मजुरीविषयी तक्रार आहे. याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.- संजय गजपुरे, जि.प. सदस्य पारडी- बाळापूर