आॅनलाईन लोकमतराजुरा : चुनाळा येथील श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या बाराव्या ब्रम्होत्सव महोत्सवात चंद्रपूर लॉयन्स क्लब, सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या आलेल्या मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात २८९ मोतीबिंंदू रुग्णांना नवी दृष्टी मिळाली. शिबिरात ४६० रुग्णांनी तपासणी करण्यात आली. लोकोपयोगी उपक्रम दरवर्षी राबविण्याचा संकल्प देवस्थानच्या व्यवस्थापनाने केला आहे.अध्यक्षस्थानी अंबूजा सिमेंट फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक सोपान नागरगोजे, उद्घाटक उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून माणिकगड सिमेंट कंपनीचे प्रमुख राजेंद्र काबरा, आर्यन कोल वॉशरीजचे व्यवस्थापक मनोजकुमार राठोड, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक मेडपल्लीवार, लॉयन्स क्लबचे प्रकल्प निदेशक डॉ. मंगेश टिपणीस, सुनील कुळकर्णी, राजबिरसिंग, लक्ष्मणदास काळे महाराज, श्री क्षेत्र धाबा येथील अशोक भस्की महाराज, पोलीस पाटील रमेश निमकर, देवस्थानचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, देवस्थान कमिटीचे श्याम पुगलिया, शंकर पेद्दुरवार, मनोज पावडे, सुरेश सारडा, अशोक शहा, गोरखनाथ शुंभ आदी उपस्थित होते.देवस्थान कमिटीच्या वतीने केवळ धार्मिक विधी न करता परिसरातील गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी ब्रम्होत्सव सोहळ्याच्या माध्यमातून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कार्याची परंपरा सुरू ठेवली आहे. त्यामध्ये रोगनिदान रक्तदान शिबिर, अपंगांना तीन चाकी सायकल वाटप, भोजनदान, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचा समावेश आहे. १२ वर्षांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन देवस्थानाच्या माध्यमातून केले जाते. या शिबिराचा शेकडो रुग्ण लाभ घेतात. लॉयन्स क्लब, सेवाग्राम मेडिकल कॉलेजसारख्या सामाजिक संस्थांनी सहकार्य केल्याने देवस्थानाच्या उपक्रमातून नवा आदर्श निर्माण झाला आहे. शिबिरात ४६० रुग्णांची तपासणी करून २८९ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यातील ५० रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे पाठविण्यात आले. उर्वरित रुग्णांना दिलेल्या तारखेनुसार सेवाग्राम येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरात मेडिकल कॉलेज सेवाग्रामचे डॉ.शुक्ला यांच्या नेतृत्वात डॉ.संतोष वर्मा, डॉ. रवी डबरासे, डॉ.लखन राठी, सचिन ताकसांडे, सुशील वाणी आदींनी रुग्णांची तपासणी केली.माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन विकास मेंढूलकर यांनी केले. आभार शंकर पेद्दूरवार यांनी मानले.
२८९ मोतीबिंदू रुग्णांना मिळाली दृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:48 PM
चुनाळा येथील श्री तिरुपती बालाजी देवस्थानच्या बाराव्या ब्रम्होत्सव महोत्सवात चंद्रपूर लॉयन्स क्लब, सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या आलेल्या मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात २८९ मोतीबिंंदू रुग्णांना नवी दृष्टी मिळाली.
ठळक मुद्देश्री तिरुपती देवस्थानचा उपक्रम : ४६० रुग्णांची तपासणी