लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील पडोली परिसरामध्ये २८ लाख २८ हजार रुपयांचा देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पडोली येथील एका कोळसा ठेवण्यात आलेल्या प्लाटमध्ये अवैध दारूसाठा असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी कोळश्याच्या प्लॉटची तपासणी केली असता एका खोली खोलीमध्ये विदेशी दारुचे १३३ बॉक्स तसेच देशी दारुचे ७१ बॉक्स असा एकूण २८ लाख २८ हजार रुपयांचा माल आढळून आला. यासंदर्भात पडोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ईमया येलप्पा मंजलवार, आमटावार्ड पडोली याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात घेतले.सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक ओ.जी. कोकाटे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वैरागडे, सहायक फौजदार पंडीत वºहाटे, पोलीस हवालदार विजय संगीडवार, अनुप अमजद खान, अविनाश दशमवार, रवींद्र पंधरे, विनोद जाधव, मयुर येरणे, चंद्रशेखर आसुटकर, वामन ढाकणे यांनी केली.
एलसीबीने पकडला २८ लाखांचा दारुसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:38 AM
येथील पडोली परिसरामध्ये २८ लाख २८ हजार रुपयांचा देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पडोली येथील एका कोळसा ठेवण्यात आलेल्या प्लाटमध्ये अवैध दारूसाठा असल्याची माहिती मिळाली.
ठळक मुद्देआरोपी ताब्यात : पडोली येथील कोळसा प्लाटची झळती