चंद्रपूर : झाडीबोली साहित्य मंडळ, साकोलीच्या वतीने झाडीबोली साहित्य मंडळ शाखा, जुनासुर्लाच्या सौजन्याने मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील मा. सा. कन्नमवार साहित्य नगरीत (श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल) येथे १२ व १३ मार्च २०२२ रोजी २९वे झाडीबोली साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षपद साहित्यिक डॉ. मनोहर नरांजे हे भूषविणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी संमेलनाध्यक्ष डाॅ. मनोहर नरांजे, तर मंचावर मंडळाचे अध्यक्ष डाॅ. हरिश्चंद्र बोरकर, हिरामन लांजे, डॉ. राजन जयस्वाल, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अंजनाबाई खुणे, संतकवी डोमा कापगते, ना. गो. थुटे, विशेष अतिथी म्हणून माजी आमदार डाॅ. हेमकृष्ण कापगते, चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे, घनश्याम येनूरकर, संदीप कारमवार, राकेश रत्नावार, विनोद अहिरकर, अखिल गांगरेड्डीवार, राजू मारकवार व सर्व पूर्वाध्यक्ष उपस्थिती राहतील. झाडीगौरव गीत शाहीर नंदकुमार मसराम हे सादर करतील.
रंगकर्मी डाॅ. परशुराम खुणे व साहित्यिक लखनसिंह कटरे यांची प्रकट मुलाखत होईल. १३ मार्च रोजी समारोप होईल. यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले, पं. स. सभापती चंदू मारगोनवार, जि. प. सदस्य शीतल बांबोळे, मूलच्या माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, माजी उपसभापती अमोल चुदरी, डाॅ. बळवंत भोयर उपस्थित राहतील. संमेलनाला रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर, लक्ष्मण खोब्रागडे, स्वागताध्यक्ष रंजित समर्थ यांनी केले आहे.
दहा लेखकांचे मांडव
झाडीपट्टीतील मान्यवरांच्या स्मृतिप्रित्यर्थ संमेलनात विविध मांडव तयार करण्यात आले आहेत. त्यात ग्रामगीताचार्य तुकाराम दादा, बाबुराव वरघंटे, एकनाथ साळवे, वि. वा. जोशी, अरूणा पवार, विनोद मोरांडे, वा. ना. निगम, आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे, टी. टी. जुलमे, क. ब. पेंदे मांडवांचा समावेश आहे.
...असे असतील कार्यक्रमांचे स्वरूप
रांगोळी स्पर्धा, पुस्तक पोहा, उद्घाटन, झाडीगौरव गीत, प्रस्तावना, दुकोडा, भूमिका, कारभार सोपवना, आदव्याची सुपारी, अनुभव, सत्कार, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, प्रकट मुलाखत, बायांचे गाणे, लोकजागृती कार्यक्रम, झाडीपट्टीची दंडार, झाडी कवी संमेलन, 'आता लिवा कता' 'चला या ना, गावा गाना' ' ‘प्राथमिक शिक्षणात बोलीचे महत्त्व' हे तीन परिसंवाद व समारोप असे दोन दिवसीय संमेलनातील कार्यक्रमांचे स्वरूप असेल.