शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

3 कोटी 44 हजार परत करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2020 5:00 AM

२०१९ मध्ये केंद्र सरकारची पीएम किसान निधी योजना सुरू झाल्यानंतर नोंदणीचे निकष कठोर नव्हते. रेशन कार्डावरही नोंदणी करता येत होती. २०२० मध्ये आधारकार्डाची सक्ती झाली. आता लाभार्थी शेतकऱ्यांचे सर्व खाते आयकर विभागाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात आले. प्रारंभी अटींमध्येच स्पष्टता नव्हती. आमचा काय दोष, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

ठळक मुद्देपीएम किसान सन्मान निधी योजना : अपात्र शेतकऱ्यांनी घेतला होता लाभ

n  राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ पासून देशात लागू करण्यात आली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रूपयांचे तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रूपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. मात्र, जिल्ह्यातील ३ हजार ४६५ कर भरण्यास अपात्र शेतकऱ्यांनी तब्बल ३ कोटी ४४ हजारांचा लाभ घेतला, असा आक्षेप केंद्र शासनाने नोंदवला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून या शेतकऱ्यांना नोटीसा पाठवून वसुलीची कारवाई केली आहे. केंद्र सरकारने दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांचा योजनेत समावेश केला होता.  नंतर व्याप्ती वाढवून जमिनीचा विचार न करता सगळ्यांनाच योजनेत समाविष्ट केले होते. 

तालुकानिहाय करपात्र शेतकरीबल्लारपूर, २२९, भद्रावती ३०२, ब्रह्मपुरी २३१, चंद्रपूर २५२, चिमूर ३२९, गोंडपिपरी १११, जिवती ४५, कोरपना १३, मूल २१५, नागभीड २०७, पोंभुर्णा ११६, राजुरा ५६७, सावली ३०२, सिंदेवाही १०६ व वरोरा तालुक्यात ४४० असे एकूण ३ हजार ४६५ शेतकरी कर भरण्यास पात्र आहेत.

अपात्रची इतर कारणेजिल्ह्यात २ लाख ७२ हजार ६७९ शेतकऱ्यांनी योजनेसाठी पात्र ठरले. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज तेव्हाच बाद करण्यात आले होते. रेशनकार्ड प्रत न जोडणे, स्वाक्षरी न करणे, जमिनीच्या पोटहिश्शांची चुकीची नोंद ही कारणे होती.  

दोष कुणाचा ? २०१९ मध्ये केंद्र सरकारची पीएम किसान निधी योजना सुरू झाल्यानंतर नोंदणीचे निकष कठोर नव्हते. रेशन कार्डावरही नोंदणी करता येत होती. २०२० मध्ये आधारकार्डाची सक्ती झाली. आता लाभार्थी शेतकऱ्यांचे सर्व खाते आयकर विभागाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात आले. प्रारंभी अटींमध्येच स्पष्टता नव्हती. आमचा काय दोष, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात राज्य शासनाकडून आलेल्या आदेशांचे पालन केले जात आहे. अपात्र लाभार्थी शोधून प्रत्येक तहसीलस्तरावर अशा याद्या तयार करण्यात आल्या. - अजय गुल्हाणे, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना