जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६० हजार ३१२ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून बरे झालेल्यांची संख्या ४२ हजार ८२३ झाली आहे. सध्या १६ हजार ५८४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ९०५ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ८३६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २७, यवतमाळ २७, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृतक
चंद्रपुरातील रामनगर येथील ७० वर्षीय महिला व ७४ वर्षीय पुरुष, छत्रपतीनगर येथील ४९ वर्षीय पुरुष, ३७ व ६१ वर्षीय पुरुष, विश्वकर्मानगर येथील ५२ वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी परिसरातील ६२ व ७२ वर्षीय पुरुष, रयतवारी कॉलनी परिसरातील ४३ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील २७ वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील ५५ वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील ६२ वर्षीय महिला, बोर्डा चंद्रपूर येथील ७० वर्षीय महिला, भिवापूर येथील ७८ वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष, जिवती तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील ४८ वर्षीय पुरुष, खापरी येथील ७६ वर्षीय महिला, मासळ येथील ५० वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, तळोधी येथील ६५ वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील ५८ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्या नगर येथील ७५ वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुष, यवतमाळ येथील ७५ वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिला, भंडारा येथील ५८ वर्षीय महिला, सावर्ला-पवनी येथील ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह
चंद्रपूर मनपा क्षेत्र ३८१
चंद्रपूर तालुका ८१
बल्लारपूर ११९
भद्रावती १७७
ब्रह्मपुरी ६९
नागभीड ८८
सिंदेवाही ५७
मूल ५८
सावली २६
पोंभूर्णा १९
गोंडपिपरी ४९
राजुरा १०७
चिमूर ६०
वरोरा २०५
कोरपना १४२
जिवती ११
अन्य १८