चंद्रपूर जिल्ह्यात २२ लाख ४२ हजार ६२ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने तयार ठेवले आहे. ५० हजार लसी मिळाल्या तरी एकाच दिवस लसीकरण पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. मात्र, लस पुरवठ्याच्या गोंधळात नियोजनाची उद्दिष्टपूर्ती करणे शक्यच नाही. त्यामुळे उपलब्ध लसीनुसार दररोज ५० ते ७५ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. आता ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटांतील नागरिकांच लस दिली जात आहे. पुरेसा लससाठा उपलब्ध होत नसल्याने चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू ठेवणे अशक्य झाले. आरोग्य कर्मचारी व प्रंटलाईन वर्करचा पहिला व डोस पूर्ण होण्याच्या टप्प्यात आला आहे. लस घेतल्याने कोरोना झाल्यानंतर प्रकृतीत समस्या निर्माण होत नाही, हे आरोग्य विभागाने जाहीर केले. त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांचा कल वाढला. ३ लाख ३१ हजार नागरिकांनी लस घेतली. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरण अत्यल्प आहे. मात्र, कोरोनाविरुद्ध लढण्याची सकारात्मक मानसिकता नागरिकांना निश्चितपणे बळ देणार, असा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे. लस घेतल्याने हिंमत वाढल्याची कबुली नागरिकही देत आहेत.
८ हजार ३६७ सहव्याधी नागरिकांना दिलासा
चंद्रपूर मनपा क्षेत्र व ग्रामीण भागात ५२ हजार ३२९ सहव्याधी नागरिकांनी पहिला डोस घेतला. प्रतिकारशक्तीमुळे शासनाने या वयोगटाला प्रथम दिले होते. मंगळवारपर्यंत ८ हजार ३६७ जणांनी दुसरा डोस घेतला. दुसरा डोस घेतल्यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्याची सकारात्मकता निर्माण झाल्याचा आनंदही अनेकांनी व्यक्त केला आहे.
१८ ते ४४ वयोगटांतील २० हजार ५१२ जणांना डोस
केंद्रात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटांतील २० हजार ५१२ जणांचे लसीकरण झाले. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार या वयोगटाचे लसीकरण सध्या बंद करण्यात आले. त्यामुळे काही केंद्रांवर ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेणे शक्य होत आहे.
लशीअभावी मोहीम मंदावली
६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात तीन किंवा चार केंद्र सुरू असतात. परंतु, जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरी परत जावे लागते. परिणामी, नागरिकांचे लसीकरण मंदावले आहे. पुरेसे डोस मिळाले तरच लसीकरण पूर्ण करून कोरोनाविरुद्ध लढा देऊन मात करता येऊ शकेल.
लसीसाठी पात्र नागरिक- २२, ४२, ०६२
आतापर्यंतचे लसीकरण- ३,३१,५६३
पहिला डोस घेणारे- २, २०,५२०
तालुकानिहाय लसीकरण
राजुरा १७२६८
वरोरा २३००४
ब्रह्मपुरी २५१२८
भद्रावती २७९९९
चिमूर १२८६७
मूल १७८८३
सिंदेवाही १५११७
चंद्रपूर ग्रामीण २५०५९
बल्लारपूर २०२७४
कोरपना १८३१३
सावली१४५८६
गोंडपिपरी१०३२९
नागभीड १७५१८
जिवती ४८८०
पोंभुर्णा ९७८०
एकूण ३,३१,५६३