मूल : स्थानिक विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने मूल येथे राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली. या लोकअदालतीमध्ये मूल पंचायत समिती अंतर्गत ३३ ग्राम पंचायतीचे सुमारे २४७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ४७ प्रकरणामध्ये तोडगा काढण्यात आला असून सुमारे २ लक्ष ९३ हजार ५६७ रूपयाची करवसुली करण्यात आली. याकरवसुलीमुळे गावाचा विकास करण्यासाठी मदत होणार आहे.
विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली. यामध्ये 33 ग्राम पंचायतीसाठी एकाच दिवशी एकाच वेळी लोकअदालतीचे आयोजन केले. यामध्ये २४३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. सदर लोकअदालतीमध्ये एका दिवसात ४७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातुन सुमारे २ लाख ९३ हजार ५६७ रूपये कर वसुली करण्यात आली.
लोकअदालतमध्ये तालुक्यतील टोलेवाही ग्राम पंचायत मध्ये ५ प्रकरणातुन ५१ हजार७७१ रूपयाचा भरणा केलेला आहे. जानाळा ग्राम पंचायतीने २ प्रकरणातुन १२ हजार ८२६ रूपये, चिखली ग्राम पंचायत ३ प्रकरणातुन २१ हजार ८७७ रूपये, चिखली ग्राम पंचायतने ३ प्रकरणात २० हजार ४०६ रूपये, विरई ग्राम पंचायतने ३ प्रकरणात ११ हजार १६६ रूपये, नवेगांव भुजला ग्राम पंचायतने २ प्रकरणात ११ हजार ७७५ रूपये करवसुली करण्यात आली आहे.
करवसुलीसाठी मूल येथील विधी प्राधिकरण न्यायालय व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. यासोबतच जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यपालन अधिकारी (पंचायत), तथा मूलचे संवर्ग विकास अधिकारी कपील कलोडे, सहा. गटविकास अधिकारी जिवन प्रधान, संजय पुप्पलवार यांनी परिश्रम घेतले.