शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

इरई धरणात ३० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:49 PM

यंदाचा पावसाळा जिल्ह्याला चांगल्याच वाकुल्या देऊन गेला. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जलसाठ्या पाणी साठू शकले नाही.

ठळक मुद्देमनपाने गंभीर व्हावे : चंद्रपूरकरांवर पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यंदाचा पावसाळा जिल्ह्याला चांगल्याच वाकुल्या देऊन गेला. सरासरीच्या ५० टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील जलसाठ्या पाणी साठू शकले नाही. चंद्रपूरकरांना पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात आता नोव्हेंबर महिन्यातच केवळ ३०.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाईप लाईन लिकेज होऊन सद्यस्थितीत अतिशय अनमोल असलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे.मागील वर्षीच शेतकºयांच्या हातचे असले नसले अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने यावेळी वरूणराजा वक्रदृष्टी पाडणार नाही, अशी अपेक्षा शेतकºयांची होती. या आशेवरच शेतकºयांनी यंदा मशागतपूर्व शेतीची कामे केली. हवामान खात्यानेही यंदा चांगला पाऊस बरसेल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरूणराजाने फोल ठरविला. ज्यावेळी पावसाची गरज होती, त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकºयांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बºयापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाºया महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणात २०३.८२५ मीटर पाणी आहे. म्हणजेच केवळ ३०.४४ टक्के पाणी आहे. दर तीन-चार दिवसात ०.२५ मीटरने धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. हिवाळ्यातील नोव्हेंबर महिन्यातच धरणाची अशी भयावह स्थिती आहे. विशेष म्हणजे, याच धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रही पाणी घेते. त्यामुळे धरणातील पाणी आणखी किती दिवस चंद्रपूर शहर व वीज केंद्राची गरज भागवू शकेल, याचा कुणालाही अंदाज येईल. हिवाळ्यात चंद्रपूरकरांना कसेबसे पाणी मिळू शकेल. मात्र उन्हाळ्याच्या प्रारंभीच यंदा चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.इतर धरणेही चिंताजनकचयंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. नोव्हेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला आहे. जिल्ह्यातील ११ धरणापैकी अनेक धरणात ५० टक्क्याहून कमी जलसाठा शिल्लक आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नाही. त्यांचा अद्याप पाणी टंचाई आराखडा तयार झालेला नाही.