भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुक्यात सिंचनाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे शेतकरी शेती कसायला मागे पुढे पाहतो, त्यातच युवापिढीला शेती करण्यात रस नाही. असे असताना काही महिलांनी शेती व्यवसायात गुंतत कृषी विकासाला चालना दिली आहे. योग्य नियोजन करून शेती केल्यास शेतीतून चांगल्या पध्दतीने उत्पन्न घेता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. १८ गावातील या ३० शेतकरी महिलांचा कृषी विभागामार्फत महिला किसान दिनी सन्मानही करण्यात आला.
मूल तालुक्यातील १८ गावातील काही महिला शेती करीत आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून शेती कसत आहेत. अपुरे सिंचन सुविधेमुळे काही शेतकरी शेती विक्री करीत असतानाच काही महिला त्यास विरोध करून मिळून शेती करण्यास पुढाकार घेत आहेत. ठिंबक सिंचनाचा माध्यमातून धानशेती करण्याकडे तालुक्यातील शेतकरयांचा विशेष कल आहे. काही महिला मोग?्याच्या फुलबाग तयार करून त्यापासून उत्पन्न घेत आहेत. नविन तंत्रज्ञानाचा वापर करून काही महिला शेतकयांनी भाजीपाला लागवड केली आहे.घरीच असलेल्या गाय, बैल, म्हशीच्या शेणापासून शेणखत तयार करून त्या खतापासून सेंद्रीय भाजीपालाचे उत्पादन घेत आहेत. घरी असलेल्या खुल्या जागेत काही महिला परसबाग तयार करून त्यापासूनही घरघुती लागणारा भाजीपाल्याचे उत्पन्न घेत आहेत. या शेतकरी महिलांसह शेतमजूर महिला व कृषी उत्पादनात विशेष आवड असलेल्या ३० महिलांचा कृषी विभागानेही दखल घेतली असून कृषी दिनानिमित्स या महिलांचा सन्मान केलेला आहे. या महिलांकडून प्रेरित होऊन इतर महिलांनी व शेतकऱ्यांनी शेतीत तंत्रज्ञान वापरण्याची गरज आहे.या शेतकरी महिलांनी केली किमयामूल तालुक्यातील मनिषा घोडमारे, योगीता कस्तुरे, संध्या कुंभरे, सुनंदा चलाख, मिना नाहगमकर, खामादेवी पेटीवार, भावना जुमनाके, अश्विनी बोलीवार, अल्का कोहपरे, मंगला बोरकुटे, बाली रायपूरे, जयश्री सोनूने, रेवता सोनूने, लिलाबाई देवतळे, उषा सिडाम, कांता मुनगटीवार, संगिता गणवीर, शालिनी लेनगुरे, भाग्यश्री ओदलवार, शिला जनबंधु, सुवर्णा दहिवले, वर्षा भुरसे, स्नेहा चलाख, सुनिता मानकर, वर्षा मानकर, सुरेखा चुनारकर, खुशी लाकडे, नंदा शेंडे, आशा गेडाम या महिलांनी शेतात राबत भरघोस उत्पादन घेत किमया साधली आहे१८ गावातील सुमारे ३० महिलांनी कृषी विकासाला चालना दिली आहे. आम्ही त्यांचा सन्मान केला आहे. यामुळे इतर महिलांना कृषीवर आधारित काम करण्यास प्रोत्साहन मिळू शकते.-आर.एस. उईके,कृषी पर्यवेक्षक,मूल.