शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

जिल्हा परिषदचे ३१ शिक्षक दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:34 PM

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांची जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली होती. या बदलीसाठी विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोनमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतला.

ठळक मुद्देबनावट प्रमाणपत्र प्रकरण : सीईओंनी बजावले नोटीस
<p>राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकांची जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली होती. या बदलीसाठी विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोनमधील काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून बदलीचा लाभ घेतला. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. २१ जुलैपासून सतत तीन दिवस वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली. दरम्यान शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या आदेशानुसार सर्व पंचायत समित्यांमधील बदलीपात्र शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. यात तब्बल ३१ शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदली करून घेतल्याचे स्पष्ठ झाले आहे.दरम्यान, खोटे प्रमाणपत्र सादर केलेल्या ३१ शिक्षकांना शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून शेवटची संधी दिली आहे. या सर्व शिक्षकांनी दोन दिवसात राज्य शासनाच्या बदली धोरणानुसार स्पष्टीकरण दिले नाही तर एक वेतनवाढ कायमची रोखली जाणार आहे. याशिवाय जे शिक्षक खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर तालुका अथवा जिल्हास्थळी बदली करून घेतली त्यांना परत त्याच ठिकाणी पाठविण्यात येणार आहे.‘त्या’ दोषी शिक्षकांची वेतनवाढ बंद करणारचंद्रपूर : राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने बदलीचे सुधारीत धोरण लागू केले. त्यानुसार जिल्ह्यात विशेष संवर्ग एक व दोन मध्ये आॅनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे होते. या दोन्ही संवर्गात बनावट प्रमाणपत्र सादर करून राज्य शासनाची फसवणूक केली. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर शिक्षण विभागाने तब्बल ६५२ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू केली. गटशिक्षणाधिकाºयांच्या माध्यमातून पंचायत समितीस्तरावर ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली.बदली करून घेतलेल्या शिक्षकांकडून प्रमाणपत्र व संबंधीत कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर ३१ शिक्षक दोषी आढळले. या शिक्षकांना अखेरची संधी म्हणून स्पष्टीकरण सादर करण्याची नोटीस सीईओंनी शुक्रवारी जारी केले. बनावट प्रमाणपत्राच्या आधारावर बदली करून घेणाºया तालुक्यामध्ये भद्रावती, चंद्रपूर, वरोरा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, सावली, मूल, पोंभुर्णा आदींचा समावेश आहे.विशेष म्हणजे यानंतरच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रकरणात या दोषी शिक्षकांना सहभागी होण्यास प्रतिबंध घालण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर करणार आहेत.१३ बदली प्रकरणे न्यायप्रविष्ठजिल्हा परिषदेतील १३ शिक्षकांनी बदली प्रकरणामध्ये न्यायालयात याचिका दाखल केली. शासनाच्या धोरणांना ठेंगा दाखवून बदली करून घेतल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाईच्या नोटीसा बजावल्या होत्या. मात्र या शिक्षकांनी थेट न्यायालयात आव्हान दिले आहे.दोषी आढळलेले तालुकानिहाय शिक्षकखोटे प्रमाणपत्र सादर करणाºयांमध्ये चंद्रपूर, राजुरा व भद्रावती तालुक्यातील प्रत्येकी ४, वरोरा ५, ब्रह्मपुरी ६, सिंदेवाही व सावली तालुक्यात प्रत्येकी ३, मूल व पोंभुर्णा तालुक्यातील प्रत्येकी एका अशा ३१ शिक्षकांचा समावेश आहे. विद्याज्ञानाचे पवित्र कार्य करणाºया शिक्षकांनीच बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ठ झाल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.३१ शिक्षकांना शुक्रवारी नोटीस बजावण्यात आली. तपासणीदरम्यान या शिक्षकांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले. नियमानुसार कारवाई करण्यापुर्वी संबंधित शिक्षकांना स्पष्टीकरणासाठी एक संधी देण्यात आली आहे. यात दोषी आढळल्यास कारवाई होईल.- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) चंद्रपूर.