लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये बाहेर राज्यातून अडकून पडलेले नागरिक व कामगार मोठया प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने राहण्याची व्यवस्था म्हणून जिल्हाभरात ३३ निवारागृहे तयार केली आहेत. यात दोन हजार व्यक्ती राहू शकणार आहेत.बाहेर राज्यातून अडकून पडलेले नागरिक, कामगार, मजूर यांनी कोणताही प्रवास न करता महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच जिल्हास्तरावर सुरू करण्यात आलेल्या शेल्टर हाऊस अर्थात निवारा गृहामध्ये राहण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर दोन हजार नागरिकांची क्षमता असलेले एकूण ३३ निवारा गृह तयार करण्यात आले आहे. या निवारा गृहामध्ये राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात मनपा शाळा जटपुरा गेट, गंज वॉर्ड चंद्रपूर येथील रात्र निवारा, रामचंद्र नागेर हिंदी शाळा जटपुरा गेट, सरदार पटेल प्रायमरी स्कूल जटपुरा, लोकमान्य टिळक कन्या प्रायमरी स्कूल पठाणपुरा, कर्मवीर प्रायमरी स्कूल बंगाली कॅम्प, भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर स्कूल आंबेडकर नगर, सरदार पटेल कन्या शाळा नगिनाबाग, महाकाली कन्या शाळा, बल्लारपूर तालुक्यातील नगर परिषद बचत भवन, राजुरा तालुक्यातील झाकीर हुसेन प्रायमरी स्कूल व सम्राट अशोक हायस्कूल देवाडा, कोरपना तालुक्यातील भाऊराव चटप आश्रम शाळा कोरपना व जिल्हा परिषद शाळा गडचांदूर, जिवती तालुक्यातील फॉरेस्ट रेस्ट हाऊस, गोंडपिपरी तालुक्यातील गर्ल्स स्कूल व कन्यका मंदिर, पोंभुर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, मूल तालुक्यातील पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस, सावली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागभीड तालुक्यातील गव्हर्मेंट रेस्ट हाऊस व जनता विद्यालय, ब्रह्मपुरी तालुक्यातील पंचायत समिती व राजीव गांधी भवन, चिमूर तालुक्यातील शहीद रायपूरकर सभागृह, कॅनेल वसाहत जवळबोडी व जिल्हा परिषद शाळा उसेगाव, सिंदेवाही तालुक्यातील पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस, वरोऱ्यातील भारतभूषण मालवीय प्रायमरी स्कूल व इंदिरा गांधी स्कूल, भद्रावतीतील गव्हर्नमेंट हॉस्टेल आदी निवारागृहांचा समावेश आहे.मनपातर्फे वयोवृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी घरपोच सेवाचंद्रपूर : संचारबंदीच्या काळात शहरातील एकटे राहणारे वयोवृध्द व दिव्यांग व्यक्ती यांना आपल्या गरजेच्या वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडणे शक्य नसल्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून किराणा सामान, औषधे इत्यादी साहित्य घरपोच पोहचविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. याकरिता मनपातर्फे कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून कर्मचाºयांना त्यांच्या संबंधित प्रभागातील वयोवृध्द नागरिक व दिव्यांग व्यक्तींनी दूरध्वनीद्वारे संपर्क केल्यास संबंधित नागरिकाच्या खर्चाने किराणा सामान व औषध खरेदी करुन त्यांना घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावेराज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. जिल्हाधिकारी यांनी २५ मार्चपासून कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी २१ दिवसांकरिता प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत. याचे पालन करावे.प्रत्येक महिन्यात त्याच महिन्याचे धान्य वितरण होणारचंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना पुढील तीन महिन्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप करावयाचे असल्याने तीन महिन्याचे धान्य वाटपाच्या कार्यवाहीत बदल करण्यात आलेला आहे. नव्याने राज्य शासनाकडुन ३१ मार्च रोजी प्राप्त निर्देशानुसार एप्रिल-२०२० मध्ये फक्त एप्रिल महिण्याचे धान्य वितरित केले जाणार आहे. हे धान्य वितरित झाल्यानंतर एप्रिलमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रति मानसी पाच किलो तांदूळ मोफत वाटप केले जाणार आहे. जे लाभार्थी विकतचे धान्य घेतील अशाच शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केल्या जाईल. याची सर्व शिधापत्रिकाधारकांनी नोंद घ्यावी. अंत्योदय योजनेच्या कार्डधारकांनासुध्दा त्यांचे शिधापत्रिकेत जेवढया व्यक्ती समाविष्ट आहेत त्या प्रत्येक व्यक्तीसाठी पाच किलो तांदूळ दिले जाईल. ही योजना एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांपुरतीच मर्यादित राहील. लाभार्थ्यांनी त्यांना नेमुन दिलेल्या रास्तभाव दुकानातूनच दोन्ही योजनेच्या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेद्र मिस्कीन यांनी केले आहे. धान्य घेतेवेळी दुकानात एका वेळेस दोन व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाहीत. तसेच दोन ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राहील, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहे.नागभीडमध्ये २,४४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्येनागभीड : नागभीड तालुक्यात कोरोना विषाणुची लागण झालेले एकही रुग्ण नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नागभीड तालुक्यात आतापर्यंत दोन हजार ४४३ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि दोन जणांना चंद्रपूर येथे निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांना कोरोना विषाणू आजाराचे कोणतेही लक्षणे आढळून आलेले नाहीत. या आजाराला परतवून लावण्यासाठी कोणीही घराच्या बाहेर पडू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद मडावी यांनी केले आहे.रहेमत नगर सीलचंद्रपूर : डॉ. नगराळे यांनी उपचार केलेल्या संशयित रुग्णाचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आला असला तरी कोरोनाच्या वाढत्या दहशतीत खबरदारी उपाय म्हणून त्यांच्या निधनानंतर प्रशासनाने रहमतनगर पूर्णपणे सील केले असून या प्रभागाकडे जाणारे सर्व रस्तेसुद्धा सील करण्यात आले आहेत. महानगरपालिकेने रहमानतनगर भागाचे निर्जंतुकीकरण केले आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे चंद्रपूर शहरात नेमके काय सुरु आहे, याबाबत प्रचंड चर्चा सुरु आहे. दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती. मात्र त्यांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला
परराज्यातील नागरिकांसाठी ३३ निवारागृहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:00 AM
बाहेर राज्यातून अडकून पडलेले नागरिक, कामगार, मजूर यांनी कोणताही प्रवास न करता महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत तसेच जिल्हास्तरावर सुरू करण्यात आलेल्या शेल्टर हाऊस अर्थात निवारा गृहामध्ये राहण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर दोन हजार नागरिकांची क्षमता असलेले एकूण ३३ निवारा गृह तयार करण्यात आले आहे. या निवारा गृहामध्ये राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांचे निर्देश : महत्त्वाच्या कामासाठी एकच व्यक्ती घराबाहेर पडा