लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर येथील एफडीसीएम कारवा रोडवरील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी एफडीसीएमचे अध्यक्ष चंदनसिहं चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, नगर परिषद अध्यक्ष हरीश शर्मा, महावितरणचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल, मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधिक्षक अभियंता अशोक मस्के, अनिल घोगरे, राकेश जनबंधू आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राचा कारभार हाती घेताच युती सरकारने हे राज्य वीजेच्या संदर्भात स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केला. पुन्हा या महाराष्ट्राला कधी लोडशेडींगचा सामना करावा लागणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्याचा वज्रनिर्धार आम्ही केला. त्याचे चांगले परिणाम आज सारा महाराष्ट्र अनुभवतो आहे. जनतेच्या हिताचा निर्धार मनाशी असला आणि लोकांसाठी काम करण्याची ऊर्मी असली की काय चमत्कार घडू शकतो हे राज्यातल्या विजेच्या संदर्भात बदललेल्या परिस्थितीतून स्पष्ट झाले आहे. बल्लारपूर येथील कारवा रोडवरील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या माध्यमातून कमी दाबाच्या वीजपुरवठयाच्या समस्या कायम निकाली निघणार असून बल्लारपूर शहर व तालुक्यातील गावांमध्ये सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. बल्लारपुर शहराचा वीजभार अतिशय वेगाने वाढत असल्यामुळे शहराला शाश्वत वीजपुरवठा करणाऱ्या अतिरिक्त उपकेंद्राची आवश्यकता होती. या उपकेंद्रावर शहराचा ८० टक्के भार टाकण्यात येणार असुन बल्लारपूर शहराला त्याचा मोठा फायदा होणार आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांनी केले. यावेळी महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
बल्लारपुरात ३३/११ केव्हीचे नवे विद्युत उपकेंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 10:11 PM
बल्लारपूर येथील एफडीसीएम कारवा रोडवरील ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देशहराला शाश्वत वीजपुरवठा होणार