चंद्रपूर : न्यायालयानेएसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चंद्रपूर विभागीय नियंत्रण कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार आगारांतील सुमारे ३५० कर्मचारी कर्तव्यावर आले आहे. सद्यस्थितीत ६५० च्या जवळपास कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे महामंडळाच्या बसफेऱ्या हळूहळू रस्त्यावर धावू लागल्या आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून संप सुरू आहे. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण करीत २२ एप्रिलपर्यंत कर्तव्यावर रुजू होण्याचा अल्टिमेटम दिला. त्यामुळे आठवडाभरात ३५० कर्मचारी कर्तव्यावर आल्याने आता बसफेऱ्या वाढू लागल्या आहेत.
२२ एप्रिलची डेडलाइन
- राज्यशासनात विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. न्यायालयाने संपातील कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करीत २२ एप्रिलपर्यंत कर्तव्यावर रुजू होण्याचे अल्टिमेटम दिले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे.
एसटीच्या फेऱ्या वाढणार
न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करीत कर्तव्यावर रुजू होण्याचे अल्टिमेटम दिले. त्यामुळे कर्मचारी कर्तव्यावर रुजू होत आहेत. सद्यस्थितीत ६५० कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे बसफेऱ्या वाढल्या आहेत. जसजसे कर्मचारी रुजू होतील, तसतशा फेऱ्या वाढणार आहेत.
१६२ चालक, १२९ वाहक परतले
- विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून संप सुरू होता. न्यायालयाने सुनावणी करताना २२ एप्रिलच्या आता कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे चंद्रपूर विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या चारही आगारांतील सुमारे १६२ चालक व १२९ वाहक कर्तव्यावर परतले आहे. त्यामुळे बसफेऱ्या हळूहळू वाढू लागल्या आहेत.
मागील आठवड्याभरात जवळपास ३५० कर्मचारी रुजू झाले असून ६५० कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे बसफेऱ्या वाढल्या आहेत.
-स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक नियंत्रक, चंद्रपूर