लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ३६ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके भरणे व देखभाल दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीच नाही. त्यामुळे या योजना पुढील महिन्यात बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामत: नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असून जिल्हा परिषद पदाधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर यांनी केला आहे.जलसंधारण विभागासारख्या महत्त्वपूर्ण बैठकीला ७० टक्के अधिकाºयांची अनुपस्थिती दिसून आली. त्यामुळे अध्यक्षांचा प्रशासनावर वचक नसल्याचा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला आहे. या बैठकीला लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व अन्य चार अधिकारी उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी येथील महावितरणचे अभियंता, जिल्हा कृषी अधीक्षक, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक, उपअभियंता यांत्रिकी, बांधकाम उपविभागाचे उपअभियंता यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी गैरहजर होते.जलसंधारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक असतानाही या बैठकीला ७० टक्के अधिकारी अनुपस्थित होते. नियोजनाचा अभाव व प्रशासनावर अध्यक्षाची पकड नसल्याने अधिकारी गैरहजर राहत राहतात. यामुळे विकास कामांना खिळ बसत असल्याचा आरोप डॉ. वारजूकर यांनी केला आहे.पाणी टंचाईची शक्यतायावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे नदी, नाले आताच कोरडी पडली आहेत. अनेक गावातील पाणीपुरवठा आताच प्रभावित झाला असून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईची झळ नागरिकांना सोसावे लागण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने आताच नियोजन करणे गरजेचे आहे.
३६ पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:40 PM
जिल्ह्यातील ३६ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके भरणे व देखभाल दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीच नाही.
ठळक मुद्देजलसंधारणाची बैठक : अधिकारी गैरहजर, पदाधिकाºयांचा वचक नाही