मंगळवारी ११६० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७८ हजार ५०९ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासूनच बरे झालेल्यांची संख्या ६८ हजार ८३५ झाली आहे. सध्या ८ हजार ३७३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ३९ हजार ३५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ३ लाख ५७ हजार ५८४ नमुने निगेटिव्ह आले. परंतु, २४ तासात किती तपासण्या झाल्याची याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली नाही
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत १३०१ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १२०४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ४४, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.
असे आहेत मृत
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील अंचलेश्वर वार्ड येथील ७० वर्षीय पुरूष, नेहरू नगर येथील ६२ वर्षीय पुरूष, सिव्हिल लाईन परिसरातील ६५ वर्षीय पुरूष, पडोली येथील ४५ वर्षीय पुरूष, तुकूम परिसरातील ५६ वर्षीय महिला, नगीनाबाग येथील ६९ वर्षीय महिला, ४९ वर्षीय महिला, देवाडा येथील ७० वर्षीय पुरूष, कोकेवाडा येथील ४३ वर्षीय पुरूष किटाळी-शिदूर येथील ६१ वर्षीय महिला, पांढरकवडा येथील ४२ वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील ८२ वर्षीय महिला, विसापूर येथील ५२ वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील ५५ व ६५ वर्षीय महिला, मूल तालुक्यातील ६८ व ७६ वर्षीय पुरूष, भद्रावती तालुक्यातील ६८ व ७५ वर्षीय पुरूष, गोंडपिपरी तालुक्यातील ३७ वर्षीय पुरूष, कोरपना तालुक्यातील २३ वर्षीय पुरूष, चिमूर तालुक्यातील ६० वर्षीय महिला, अडेगाव येथील ६० वर्षीय महिला, नागभीड तालुक्यातील ६० वर्षीय महिला तर वणी येथील ६१ वर्षीय पुरूष व ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर मनपा क्षेत्र १२७
चंद्रपूर तालुका ३३
बल्लारपूर २७
भद्रावती ०६
ब्रह्मपुरी १६
नागभीड १९
सिंदेवाही १२
मूल २५
सावली १६
पोंभूर्णा ०७
गोंडपिपरी १९
राजुरा १६
चिमूर ०३
वरोरा २१
कोरपना १५
जिवती ०३
अन्य ०५