चिमूर : चिमूर विधानसभा क्षेत्रात चिमूर तहसील कार्यालय, अप्पर तहसील भिसी, नागभीड तहसील कार्यालय, अप्पर तहसील कार्यालय तळोधी बा. असून येथील मंजूर पदातील विविध विभागांतील एकूण ३८ पदे रिक्त असल्याने जनतेची कामे होत नाहीत. त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराची दखल आमदार बंटी भांगडिया यांनी घेत राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र देऊन रिक्त पदांवर नियुक्ती करण्याची मागणी केलेली आहे.
चिमूर तहसील कार्यालयात एकूण ४५ मंजूर पदे असताना २२ पदे रिक्त आहे. त्यात नायब तहसीलदार तीन पदे रिक्त आहे, तर १९ कर्मचारी पदे रिक्त आहेत. भिसी अप्पर तालुका कार्यालयात तीन पदे रिक्त आहेत. त्यात एक अप्पर तहसीलदार, तर तीन कर्मचारी रिक्त आहे. नागभीड तहसील कार्यालयात २८ पदे मंजूर असून त्यात आठ पदे रिक्त आहे. त्यात नायब तहसीलदार एक तर कर्मचारी सात पदे रिक्त असून तळोधी, बाळापूर अप्पर तहसील कार्यालयात चारही पदे रिक्त आहे. त्यात अप्पर तहसीलदार व तीन कर्मचारी पदे रिक्त आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रातील तहसील कार्यालयातील ३८ रिक्त पदांवर नियुक्ती उपाययोजना करण्याची मागणी आमदार बंटी भांगडिया यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रातून केली असून महसूलमंत्री, प्रधान सचिव महसूल विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केलेले आहेत.