मंगेश भांडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जनतेला कुष्ठरोग मुक्त करणे व कुष्ठरोग निवारण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातंर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी व आशा स्वंयसेविकांमार्फत ५ ते २० सप्टेंबर २०१७ या कालावधीत कुष्ठरोगींची शोधमोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत ग्रामीण व शहरी भागातील जनतेमध्ये कुष्ठरोगाबाबत जनजागृती केली असता तब्बल ४ हजार ८३२ संशयित कुष्ठरोगी आढळून आले. यातील ३५३ कुष्ठरोगींवर निदान करण्यात आले आहे.राज्य शासनाच्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातंर्गत राज्यभरात कुष्ठरोगींची शोध मोहीम राबविण्यात आली होती. यात चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश होता. ५ ते २० सप्टेंबर या कालावधीत करण्यात आलेल्या शोधमोहीमेत चंद्रपूर जिल्ह्यातील १७ लाख २६ हजार ४७२ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यांची आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्या मार्फत घरोघरी जावून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४ हजार ८३२ संशयीत रुग्ण शोधण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्तरावर वैद्यकीय अधिकारी व कुष्ठरोग विभागाच्या कर्मचाºयांनी सर्व संशयीत रुग्णांची तपासणी करून ३५३ रुग्णांचे निदान केले आहे. या रुग्णांवर लगेच उपचार सुरू करण्यात आले आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करून औषधोपचार केला जात असून कुष्ठरोग दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.ही आहेत कुष्ठरोगाची लक्षणेअंगावर बधीर चट्टा असणे, फिक्कट, चकाकनारा चट्टा.न खाजवणारा, न दूरवणारा चट्टा असणे.त्याला थंड, गरम न समजणे.पायाचे बोटे व हाताची बोटे यामध्ये बधीरता येणे, मुंग्या येणे.लवकर उपचार न घेतल्यामुळे हाताची बोटे व पायाची बोटे यामध्ये विकृती निर्माण होते.कुष्ठरोगाबाबत जनतेच्या मनात अंधश्रद्धा, भिती व चुकीचे गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्याकडून सतत जनजागृती करण्यात येत आहे. सोबतच जनतेला आरोग्य शिक्षण दिले जात आहे. यामुळे जनतेचा सहभाग लाभत आहे.- डॉ. डी. एन. पांडे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग)जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.
४ हजार ८३२ संशयित कुष्ठरोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:36 AM
जनतेला कुष्ठरोग मुक्त करणे व कुष्ठरोग निवारण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातंर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी व आशा स्वंयसेविकांमार्फत.....
ठळक मुद्दे३५३ रुग्णांवर निदान : शोध अभियानातून आढळले रुग्ण