बल्लारपूर: येथील दहेली-कळमना या महामार्गावर गुरुवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास गायींनी भरलेला ट्रक (एमएच ३४ बी एल २४५१) पकडण्यात आला. या ट्रकमधून जवळपास ४० गायींना कोंबून नेले जात होते. या सर्व गायींची सुटका करून लोहारा येथील गोशाळेत पाठविण्यात आले.
संशयाच्या आधारावर गोरक्षकांनी हा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न अयशस्वी ठरला. ट्रकचालकाने भरधाव वेगाने ट्रक पळविला; परंतु ट्रकच्या मागचे चाक पंक्चर झाले आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला ठेवून चालक फरार झाला. गोरक्षकांनी लगेच त्यांचे सहकारी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलिसांना कळविले. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेंद्र तिवारी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. ट्रकमधून सुमारे ४० गायींची सुटका करण्यात आली. या गायी तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेण्यात येत होत्या. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बल्लारपूर पोलीस व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि स्थानिक गोरक्षक कार्यकर्ता कैलास जोरा, सत्यनारायण खेंगर, राज निषाद, अमित चक्रवर्ती, प्रशांत दारला, विकी मांढरे, विशांत ठाकूर, शशांक ठाकूर, जय ठाकूर, संदीप ठाकूर आदींच्या सहकार्याने करण्यात आली.
190821\1757-img-20210819-wa0032.jpg
गो तस्करांच्या तावडीतून ४० गायींची गोरक्षकांनी केली सुटका