लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : ओबीसींची राष्ट्रीय पातळीवर जातनिहाय जनगणना २०२१ करावी, या मागणीसाठी धनोजे कुणबी समिती भद्रावती आणि मराठा सेवा संघ, शाखा राजुराच्या वतीने भद्रावती येथे आयोजित राज्यस्तरीय धनोजे कुणबी वधू-वर परिचय मेळाव्यातून केंद्रीय गृह मंत्रालयाला ४ हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आले. ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. अंजली साळवे यांच्या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून गावागावातून या मागणीचे पोस्टकार्ड पाठविण्यात आले आहे.भद्रावती शहरात नुकताच दोन दिवसीय राज्यस्तरीय धनोजे कुणबी वधू-वर परिचय मेळावा व सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते. ओबीसी जनगणना -२०२१ या मोहिमेची माहिती मिळावी, यासाठी राजुरा तालुका मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष दिनेश पारखी यांनी परिचय मेळाव्यात स्टॉल लावून ४ हजार पोस्टकार्ड आणि ‘२०२१ च्या जनगणना ओबीसी चा कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही’ साठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. हे पोस्टकार्ड आणि सह्या केलेले निवेदन गृह मंत्रालयाला पाठविण्यात आले. अॅड. अंजली साळवे-विटणकर, दिनेश पारखी, बळीराज धोटे यांनी २०२१ च्या जणगनेत ओबीसीसाठी वेगळा कॉलम ठेवण्याचे कारण काय, याची माहिती दिली. मराठा सेवा संघतर्फे पांडुरंग टोंगे यांना शिवधर्मगाथा हा ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. ओबीसी जातनिहाय जनगणनेच्या पुढील मोहिमेसाठी उपस्थित नागरिकांनी १६ हजारांची मदत केली. यावेळी माजी आमदार अॅड. वामनराव चटप, अॅड. संजय धोटे, सतीश धोटे, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मनोहर पाऊनकर, देवराव भोंगळे, प्रतिभा धानोरकर, पांडुरंग टोंगे, नवविवाहित दांपत्य, सतीश मालेकर, अनिल डहाके, प्रशांत काळे, प्रवीण ठेंगणे यांनी भेटी देऊन पोस्ट कार्ड तसेच जनगणनेत सहभाग नाही या पत्रांवर स्वाक्षरी केल्या. दिनेश पारखी यांना समाजभूषण प्रदान करण्यात आला.यशस्वीतेसाठी दिनेश पारखी, लक्ष्मण तुराणकार, सुनील गौरकार, विजय मोरे, बाबुराव मुसळे, लक्ष्मण घुगुल, संभाजी साळवे, संतोष रामगिरवार, दत्तात्रय मोरे, सचिन गौरकार, वंदना पारखी, कांचन तुराणकर, विजयमाला वºहाटे, बंडू डाखरे, प्रकाश पिंपळकर, निखिल घुगुल, राहुल वºहाटे, प्रज्वल पारखी आदींनी सहकार्य केले.२० जानेवारीला जिल्हा कचेरीवर धरणे२०२१ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे २० जानेवारी २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातून हजारो ओबीसी समाज बांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर, महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. नितीन कुकडे, उपाध्यक्ष प्रा. संजय बरडे, कार्याध्यक्ष प्रा. बबनराव राजूरकर, महासचिव प्रा. विजय मालेकर, बबनराव वानखेडे, बबनराव फंड, प्रा. अशोक पोफळे, प्रा. प्रविण जोगी, प्रवीण चटप, महादेव ढोरे, श.स. गारघाटे, राहूल लठारे, सुरेश बरडे, सूर्यकांत साळवे, श्यामजी लेडे, सरचिटणीस रमेश ताजने व सर्व तालुकाध्यक्षांनी केले आहे.
ओबीसींच्या जनगणनेसाठी पाठविले गृह मंत्रालयाला ४ हजार पोस्टकार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 5:00 AM
ओबीसींची राष्ट्रीय पातळीवर जातनिहाय जनगणना २०२१ करावी, या मागणीसाठी धनोजे कुणबी समिती भद्रावती आणि मराठा सेवा संघ, शाखा राजुराच्या वतीने भद्रावती येथे आयोजित राज्यस्तरीय धनोजे कुणबी वधू-वर परिचय मेळाव्यातून केंद्रीय गृह मंत्रालयाला ४ हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आले. ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अॅड. अंजली साळवे यांच्या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळाला असून गावागावातून या मागणीचे पोस्टकार्ड पाठविण्यात आले आहे.
ठळक मुद्देधनोजे कुणबी समितीचा उपक्रम : अंजली साळवे यांच्या संकल्पनेला प्रतिसाद