लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी राज्याच्या मंत्रिमंडळात प्रस्ताव पारित झाल्याने दीर्घकाळ रेंगाळलेला गुंता सोडविण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यश आले. विशेष म्हणजे यातील ४२ अतिक्रमण धारकांना एकमुस्त रक्कम देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.कोणत्याही शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या या अतिक्रमण धारकांना देण्यात आलेली ही मदत आहे. तथापि ही बाब अन्य कुठेही पूर्व उदाहरण म्हणून वापरण्यात येऊ नये, असेही या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. चंद्रपुरातील या अतिक्रमणधारकांना ही मदत मिळत असली तरी मूळ शासकीय आदेशानुसार यापुढेही अन्य उदाहरणांमध्ये अतिक्रमण नियमाकुल करण्यास पात्र नसतील तर त्यांना कोणताही मोबदला देण्यात येऊ नये, ही राज्य शासनाची भूमिका कायम असणार आहे. अपात्र अतिक्रमणधारकांना चंद्रपूर मनपामार्फत एकमुस्त मोबदला दिला जाणार आहे. हा मोबदला देत असताना मनपाला अपात्र अतिक्रमण धारकांकडून याबाबत प्रतिज्ञापत्र घेणे आवश्यक आहे. सदर निर्णय अत्यंत अपवादात्मक बाब म्हणून एकमेव प्रकल्पासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचेही मंत्रिमंडळाच्या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे यांनी मागील अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्येही हा प्रश्न सोडविण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती. शहराच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी ही बाब आवश्यक असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी लक्षात आणून दिले होते. त्यामुळे या अपात्र ४२ अतिक्रमणधारकांना एकमुस्त मोबदला देण्यासंदर्भात निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.कोल्हापूरी बंधाऱ्यासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूरराज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कोल्हापूरी बंधाºयासाठी ४ कोटी ५० लाख २१ हजारांचा निधी शासनाने मंजूर केला. बल्लारपूर, पोंभुर्णा, मूल तालुक्यात ही बंधारे बांधण्यात येणार आहेत. बल्लारपूर तालुक्यातील किन्ही येथे एक कोटी २० लाख ४३ हजार, पोंभुर्णा येथे ६७ लाख१० हजार, बल्लारपूर तालुक्यातील काटवली येथे ९९ लाख ५७ हजार आणि ८२ लाख १६ हजार किंमतीचे दोन असे एकूण पाच कोल्हापूरी बंधाऱ्यांची कामे मंजूर झाली आहे. बांधकामाला मंगळवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जलसंधारण व त्याद्वारे पिकांना थेट संरक्षित पाण्याची सोय करणे तसेच परिसरातील जलस्त्रोतांचे पूनर्भरण करून भूगर्भजल पातळी वाढविण्यास कोल्हापूरी बंधारे उपयुक्त ठरणार आहेत. यातून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
४२ अतिक्रमण धारकांना एकमुस्त मोबदला देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 1:06 AM
शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी राज्याच्या मंत्रिमंडळात प्रस्ताव पारित झाल्याने दीर्घकाळ रेंगाळलेला गुंता सोडविण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यश आले. विशेष म्हणजे यातील ४२ अतिक्रमण धारकांना एकमुस्त रक्कम देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : बाबूपेठ उड्डाण पुलाचा प्रश्न सुटणार