शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी आर्थिक वर्षाकरीता 456 कोटी मंजूर!

By राजेश भोजेकर | Published: February 07, 2024 4:34 PM

विशेष म्हणजे जिल्ह्यासाठी असलेल्या मंजूर नियतव्ययापेक्षा 152 कोटी रुपये जिल्ह्याला अतिरिक्त मिळणार आहेत.

चंद्रपूर : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे आगामी 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी 456 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यासाठी असलेल्या मंजूर नियतव्ययापेक्षा 152 कोटी रुपये जिल्ह्याला अतिरिक्त मिळणार आहेत.

शासनाने सन 2024-25 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याकरीता 304 कोटींचा नियतव्यय मंजूर केला होता. मात्र हा निधी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय कमी असल्याने यात वाढ करून जिल्ह्यासाठी 450 कोटी मंजूर करावे, अशी आग्रही मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 8 जानेवारी 2024 रोजी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत केली होती. या मागणीला वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी तत्काळ अनुकूलता दर्शविली. त्यानुसार पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केलेल्या वाढीव मागणीनुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने 456 कोटी रुपये मंजूर केले. याबाबतचे आदेश जिल्हा नियोजन समितीला 6 फेब्रुवारी 2024 रोजी प्राप्त झाले आहेत.

राज्यस्तरीय बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याकडून करण्यात आलेल्या सादरीकरणानंतर जिल्हा योजनेचा नियतव्यय अंतिम करताना कार्यान्वयीन यंत्रणांची मागणी, जिल्ह्याचे वैशिष्ट, गरजा तसेच शासनाची प्राथमिकता इत्यादी बाबी विचारात घेऊन जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 करीता एकूण रुपये 456 कोटी (आकांक्षित तालुका व नागरी भागासाठी विशेष अतिरिक्त नियतव्ययासह) नियतव्यय शासनाने अंतिमत: मंजूर केला आहे.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन 2027-28 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत उभारण्याचे महत्वाकांक्षी लक्ष निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार शासनाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. सदर आराखड्यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविध विकास क्षेत्र व उपक्षेत्र यासंदर्भात आखण्यात आलेल्या उपक्रम/योजना/प्रकल्प यासाठी राज्य/केंद्र व जिल्हा वार्षिक योजनेद्वारे निधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतिम मंजूर नियतव्ययापैकी किमान 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यानुसार निश्चित केलेल्या जिल्ह्याच्या आर्थिक वाढीच्या धोरणांवर खर्च करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत.

जिवती आकांक्षित तालुका म्हणून घोषितनीती आयोगाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा तालुका आकांक्षित तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. आकांक्षित तालुक्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिवती तालुक्यासाठी 5 कोटी इतका निधी विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 37.83 कोटी रुपयेराज्यात गतीने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता नागरीकरणाच्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सर्व महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपंचायती यांना विशेष अतिरिक्त नियतव्यय उपलब्ध करून देण्याची आवश्यकता विचारात घेऊन, सन 2024-25 या वर्षाकरीता चंद्रपूर जिल्ह्यासाठी 37.83 कोटी इतका विशेष अतिरिक्त नियतव्यय उपलब्ध करण्यात आला आहे.

या बाबींसाठी राहणार राखीव निधीनियोजन विभागाच्या 18 ऑक्टोबर 2023 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद नावीन्यपूर्ण योजना, शाश्वत विकास ध्येय आणि मूल्यमापन सनियंत्रण व डाटा एन्ट्रीसाठी 5 टक्के निधी, महिला व बालविकास विभागाच्या सर्वसमावेशक योजनांसाठी 3 टक्के, गृह विभागाच्या योजनेसाठी ३ टक्के, शालेय शिक्षण विभागाच्या सर्वसमावेशक योजनांसाठी 5 टक्के, सांस्कृतिक कार्य विभागाच्या गड-किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके इत्यादीचे संवर्धन या योजनेसाठी 3 टक्के, महसूल विभागाच्या गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेसाठी कमाल 5 टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली