चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योग बंद आहेत. शासनाकडून नोकरभरती करण्यात येत नाही. परिणामी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. झटपट पैसे कमविण्याच्या नादात अनेकांनी या व्यवसायात उडी घेतली. परिणामी आपोआपच गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. शहरात गेलेली युवक परत आली. अनेकांच्या हातचे काम गेले. सराईत गुन्हेगाराप्रमाणे नवखे गुन्हेगारही विविध गुन्ह्यात अडकू लागली. दुचाकी चोरी, घरफोडी, दरोडे, अनेक अवैध व्यवसायात युवक गुंतत असल्याचे दिसून येत आहे.
गरीबीमुळे अनेकजण अवैध मार्गाला लागतात. दारुबंदीनंतर शहरात अवैध दारुविक्रीला उधाण आले. यातून शहरात हत्याही घडल्याचे दिसून येत आहे. यामध्ये आरोपी आणखी मृतकही युवकच असल्याचे चित्र आहेत. सद्या चंद्रपूर जिल्हा कारागृहात ४५९ बंदीवानापैकी हत्येच्या म्हणजे ३०२ प्रकरणातील १६३ जण बंदी आहेत. त्यामध्येही जास्तीत जास्त युवक असल्याने युवकांपुढे गुन्हेगारीचा किती मोठा विळखा पडला आहे, हे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत गांजा व बाऊन शुगर जप्त करण्यात आले होते. या प्रकरणामधील आरोपीही युवकच होते. त्यामुळे आम्ल पदार्थाच्या तस्करी प्रकरणातही युवकांनी शिरकाव केल्याचे धक्कादायक वास्तव दिसून येत आहे. कारागृहातून आरोपी बाहेर गेल्यानंतर एक सुजान नागरिक बनावा यासाठी कारागृहातर्फे समुपदेशन करण्यात येत असते. मात्र अनेकदा आरोपी बाहेर पडल्यानंतर त्याच्यात कुठलाच बदल न होता पुन्हा तो दुसऱ्या प्रकरणात आरोपी बनत असल्याचे समोर येत आहे.
बॉक्स
पॅरोलवरील १५० कैदी बाहेर
चंद्रपूर जिल्हा कारागृहात असलेल्या बंदीवानानाही कोरोनाची लागण झाली होती. सध्यास्थितीत जिल्हा कारागृहात असलेल्या एकूण ४५९ बंदिवानापैकी सुमारे १५० बंदिवान कोरोनामुळे पॅरोलवर आहेत. त्यांना शासनाच्या अटींद्वारे पॅरोलवर सोडण्यात आले आहे.
बाॅक्स
पैशांसाठी काहीही करण्यास तयार...
गरीबीमुळे आर्थिक अडचण दूर करण्यासाठी किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकजण गुन्हेगारीकडे वढत आहेत. दारुबंदी झाल्यामुळे झटपट पैसे कमविण्याच्या नादात अनेकांनी दारुची अवैध विक्री सुरु केली आहे. तसेच दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, घरफोडी करीत असल्याचे समोर आले आहे.
बॉक्स
हत्या प्रकरणातील १६३ आरोपी, चोरीप्रकरणातही आरोपीची संख्या लक्षणीय
चंद्रपूर जिल्हा कारागृहात असलेल्या बंदीवानापैकी सुमारे १६३ बंदीवान हत्या प्रकरणातील आहे. त्यासोबतच दुचाकी चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी, अवैध दारुविक्री आदी प्रकरणातही आरोपींची संख्या लक्षणीय आहे.